वाद मिटवण्यासाठी गेलेल्या युवकाचा धारदार शास्त्राने खून चौघांना अटक.
नाशिक जन्मत नासिक शहरांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून पोलिसांचा धाक नसल्याचे सर्वत्र चित्र आहे. नागरिक कोयते बंदूक चाकू फायटर अशा साधनांचा किरकोळ वादात वापर करत असल्याचे चित्र दिसत आहे. अशीच एक घटना गुरुवारी सातपूरच्या श्रमिक नगर या भागात घडली. श्रमिकनगर येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या प्रकाश सूर्यवंशी (३९) यांच्यावरच टोळक्याने शस्त्रांनी हल्ला केला. गुरुवारी (दि. १०) रात्री झालेल्या या हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या किडनीजवळ व पाठीवर गंभीर घाव प्रकाश सूर्यवंशी बसल्याने शनिवारी (दि. १२) उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हे शोध पथकाने चांदशी शिवारात सापळा रचून संघर्ष मोरे, प्रमोद भगत, प्रेम जाधव व भावेश अहिरे (सर्व रा. धर्माजी कॉलनी) यांना अटक केली आहे.
याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश सूर्यवंशी हे रिक्षा चालक आहेत श्रमिक नगर मधील कथे पठार येथील स्वामी नरेंद्र छाया हाईट्स मध्ये ते राहतात. रात्री आपल्या सोसायटीमध्ये गणेश पाटील यांच्यासोबत ते गप्पा मारत बसले होते
दरम्यान त्याच वेळेस मित्र असलेले गणेश पाटील यांचा आते भाऊ किरण जामदाडे यांच्याबरोबर कॉलनीतील युवकांची मोबाईल वरून झालेल्या वादातून मारहान करण्यास आलेले होते. त्यांचा वाद मिटवण्यासाठी ते मध्यस्थी करत होते याच वेळेस टोळक्याने त्यांच्यावर तीष्ण हत्याराने हल्ला केला त्याचे गंभीर जखमी झाले. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना काल दिनांक बारा रोजी त्यांचे निधन झाले. यामुळे परिसरात शोक व्यक्त करण्यात आला. मारेकरी सापडत नसल्याने पोलीस ठाण्याला नागरिकांनी घेराव घातला होता. दरम्यान प्रकाश पाटील यांना तीन मुले असून पत्नी व मुले यांचा संसार पडला आहे नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी वाढले असून पोलिसांची गस्त कमी पडत आहे.