ब्रेकिंग
नाशिकमध्ये डीजेच्या आवाजाने हार्ट अटॅक; तरुणाचा मृत्यू पंचवटीतील फुलेनगर येथील धक्कादायक घटना.
नाशिकमध्ये डीजेच्या आवाजाने हार्ट अटॅक; तरुणाचा मृत्यू
पंचवटीतील फुलेनगर येथील धक्कादायक घटना
प्रतिनिधी |
नाशिक
डीजेच्या आवाजाने रविवारी (दि.१४) रात्री एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना फुलेनगरमध्ये घडल्याची नोंद पंचवटी पोलिसांत करण्यात आली आहे.
नितीन फकिरा रणदिवे (वय २३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तीन पुतळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डीजे सुरू झाल्यानंतर जवळच उभ्या नितीनची प्रकृती बिघडली व त्याच्या नाका-तोंडातून रक्त आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. गेल्या ४ वर्षांपासून त्याला क्षयरोगाचाही त्रास होता. त्यामुळे शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. फुलेनगर परिसरामध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे.