नाशिक जनमत आई वडील पालकांच्या दुर्लक्षामुळे बालपणात मुले गुन्हेगारी कडे वळत असल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांवर संस्कार होणे महत्त्वाचे आहे. धावपळीच्या युगामध्ये ग्रामीण भाग व शरीरामध्ये आई-वडील यांचे आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. भविष्यामध्ये बाल संस्कार क्लासेस घेणे महत्त्वाचे झाले आहे. काल घोटी मध्ये घडलेल्या घटनेवरून आता प्रत्येक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तर तपासणी वेग येणार आहे.नाशिक शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरील घोटी शहरातील एका खासगी विद्यालयातील आठवी, नववीच्या ५ ते ६ विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर, चाकू, सायकलची चेन, लोखंडी कडे, निरोध व अमली पदार्थ आढळले. उपमुख्याध्यापकांनी दप्तराची अचानक तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. ही मुले नशाही करत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. याबाबत शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शिक्षा देत थेट पालकांना शाळेत बोलावून समज व लेखी हमी घेतली आहे. या घटनेमुळे पालक वर्गात खळबळ उडाली आहे. आई-वडील आपल्या मुलांसाठी कष्ट करतात मुलांना मोठे होऊन डॉक्टर वकील अधिकारी होण्याची वडील स्वप्न बघतात. परंतु मोबाईल व संगत गुण यामुळे विद्यार्थी बालपणाकडून युवा अवस्थेमध्ये जात असताना गुन्हेगारी व नशा करण्याकडे वळू लागले आहेत
(विद्यार्थ्यांच्या दप्तराची शाळेकडून रोज तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तरात अशा काही वस्तू आढळ्यास पालक व पोलिसांना बोलावण्यात येणार असल्याचे शाळेकडून सांगण्यात आले.)
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा