गोविंदनगर बोगद्याजवळ कार पेटली. कारच मोठ नुकसान.

गोविंदनगर बोगद्याजवळ कार पेटली
प्रतिनिधी |
नाशिक जन्मत सध्या मोठ्या प्रमानात नाशिक शहरातील तापमान वाढले असून आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच काल
गोविंदनगर बोगद्याजवळ गुरुवारी – (दि. ३) दुपारी एकच्या सुमारात – धावत्या कारने अचानक पेट – घेतल्याची घटना घडली. काही क्षणांतच इंजिनमधून आगीचे लोळ निघून वाहन निम्म्याहून अधिक खाक झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गोविंदनगर बोगद्याजवळून एमएच ४१ पी २२२४ या क्रमांकाची कार जात असताना अचानक इंजिनमधून धूर निघाल्याचे चालकाच्या लक्षात आले. काही क्षणांतच कारने पेट घेतला. वाहनचालक वेळीच वाहनातून बाहेर पडल्याने
जीवितहानी टळली. याबाबत माहिती मिळताच दोन अग्निशमन बंबांद्वारे आग विझवण्यात यश आले. या घटनेमुळे ४० मिनिटे गोविंदनगर बोगदा परिसरातील वाहतूक ठप्प
झाली. प्राथमिक अंदाजानुसार ही आग वाहनातील वायर्सच्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. पुढील तपास मुंबईनाका पोलिस करत आहेत.