आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन.
आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
मांडवड येथील चर्मकार समाजाच्या विनंतीवरून रोहिदास वाडा वस्तीवरील श्री लक्ष्मी माता मंदिर समोरील जागेवर आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत सभामंडपाचे भूमिपूजन आज ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब कवडे होते.
आमदार सुहास आण्णा कांदे यांचे मांडवडकरांतर्फे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने मांडवड ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.
चर्मकार समाजातील ज्येष्ठ सदस्य माजी चेअरमन श्री.सुदाम आहेर यांनी आपल्या भाषणात बोलताना माझी हयात काँग्रेस पक्षा सोबत गेली, मी आजपर्यंत खूप आमदार पाहिले पण सुहास आण्णांसारखा आमदार पहिल्यांदा पाहत आहे, आम्ही सभामंडपाची मागणी करण्यासाठी आण्णांच्या घरी जायचे ठरवले तेव्हा प्रश्न पडला की आपण तर आयुष्यभर काँग्रेस पक्षाचे काम केले, शिवसेनेचे काम कधी केलेच नाही तर कसे जायचे, पण आमदारांना भेटल्यावर आमची मागणी मांडत नाही तोच आमदारांनी तुमच्या सर्व अडचणी मी लगेच सोडवतो आणि सभामंडपाला लगेच उद्यापासून सुरुवात करतो असे सांगितल्यावर मला विश्वासच बसला नाही असे मत व्यक्त केले.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आपल्या भाषणात बोलताना आमदारकीच्या निवडणुकीत प्रचाराचा पहिला नारळ मांडवड गावातील हनुमान मंदिर येथे फुटला होता आणि बजरंग बलीच्या आशीर्वादाने आज मी आमदार आहे याची आठवण त्यांनी करून दिली. मांडवड गावातील कोण कोणत्या पक्षात काम करतो हे प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य असून आपल्याला लोकशाहीने अधिकार दिले आहेत. पण मी मतदार संघाचा आमदार आहे आणि संपूर्ण मतदार संघाच्या गावाची किंवा तेथील नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करत आहे आणि करत राहीन, यापुढेही मांडवड गावातील रस्ते फरशी सभामंडप किंवा ईतर ही विकास कामे प्राधान्यक्रम देऊन केले जातील असा विश्वास यावेळी उपस्थितांना त्यांनी दिला.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे प्रमोद भाबड अमोल नावंदर कृषी अधिकारी श्री पाटील साहेब डॉक्टर प्रवीण निकम,विठ्ठल आहेर, सुशील आंबेकर,अशोक निकम, सरपंच अंकुश डोळे, इंजिनीयर सागर आहेर, रोशन आहेर,बापू आहेर आदींसह मांडवड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सुदाम आहेर पांडुरंग आहेर संतोष आहेर कैलास आहेर महादू आहेर माणिकराव आहेर त्र्यंबक आहेर शांताराम आहेर संजय आहेर प्रकाश आहेर मधुकर गाठबांधे योगेश आहेर संत शिरोमणी रोहिदास महाराज मित्र मंडळ मांडवड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिताराम पिंगळे यांनी केले