उत्तम नगर येथे श्रीराम नवमी निमित्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन. श्रीराम मंदिर ट्रस्ट उत्तम नगर यांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

श्रीराम नवमी निमित्त जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन.
श्रीराम मंदिर ट्रस्ट उत्तम नगर यांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.
प्रतिनिधी सिडको नाशिक जनमत
सिडकोतील उत्तम नगर येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी निमित्त भव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
श्रीराम मंदिर धर्मदाय ट्रस्ट यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती अध्यक्ष जीभाऊ बच्छाव यांनी दिली. संपूर्ण धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य प्रवीण गुरव व श्रेयस उपासनी हे करणार आहेत. सुखलाल राठोड यांनी संपूर्ण मूर्तीचे आकर्षक रंगकाम केले आहे. नुकतेच मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले असून भाविकांना रामलल्लांच्या दर्शनाची अनुभूती होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष जीभाऊ बच्छाव, पुजारी प्रवीण गुरव, सचिन पाटील, विश्वनाथ नेरकर, सुभाष बडगुजर, बापू आहेर, के.जी.पाटील, प्रमोद पाटील, शांताराम भामरे, श्रेयस उपासनी, चंद्रकांत पाटील, दिलीप सावकार, नाना पवार, रमेश देवरे, रवींद्र देवरे, संजय देसले, योगेश साळुंखे, प्रवीण महाजन, राजेंद्र शिरोडे, भाऊसाहेब गायकर, दिलीप भंडारी श्रीराम युवक मित्र मंडळ, श्रीराम मंदिर महिला मंडळ आदी प्रयत्नशील आहेत.
असे आहेत कार्यक्रम –
रविवार दिनांक ६ एप्रिल रोजी सकाळी श्री प्रभू रामचंद्रांचा महाअभिषेक व महापूजा, सकाळी १० ते १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव निमित्त हभप.राजेंद्र महाराज तुपे यांचे जाहीर प्रवचन. दुपारी ठीक १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळा. दुपारी १२ ते २ सारंगी महिला भजनी मंडळ यांचा सुमधुर भजनाचा कार्यक्रम व सायंकाळी सहा ते दहा सुर संगम कराओके म्युझिकल ग्रुप यांच्या भक्ती संगीताचा कार्यक्रम , महाप्रसाद वाटप व दर्शन सोहळा संपन्न होणार आहे.
– उत्तम नगर येथील श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीराम, सितामाता, लक्ष्मण व बजरंग बली यांच्या आकर्षक मूर्ती.
२ – श्रीराम मूर्तींना आकर्षक रंगसजावट करताना कलाकार सुखलाल राठोड.)