नाशिक जन्मत विजय धात्रक कृषी अधिकारी यांच्या माहितीनुसार आज दिनांक 11 /3 2025 रोजी आमचे मित्र कै. श्री कैलास राजाराम शिरसाट वय वर्ष 57 यांचे पहाटे एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुःखद निधन झाले .ही अतिशय हृदयाला वेदना देणारी बातमी कानावर पडल्यापासून शिरसाट साहेब यांचा संपूर्ण जीवनपट माझ्या डोळ्यासमोरून तरळुन गेला .शिरसाट साहेब हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी होते. त्याकाळी चौथी इयत्ता स्कॉलरशिप परीक्षा ते पास चांगल्या मार्कांनी झालेले होते. त्यांचे वडील कै.अप्पा मिल्ट्री सेवेमध्ये यशस्वी नोकरी करून सेवानिवृत्त झाले होते. त्यांची आई या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त होऊन सहा वर्षांपूर्वी त्यांचं निधन दुर्धर आजाराने झालेलं होतं. त्यांना चार बहिणी व चार बहिणींचा एकुलता एक भाऊ हे तात्यासाहेब होते. सर्व बहिणीचे लग्न तात्याने हिरिरीने पुढाकार घेऊन लग्न करून देऊन सगळ्या बहिणींना चांगल्या ठिकाणी चांगला संसार करून आनंदाने जीवन जगत आहेत .त्यांच्या तीन भगिनी शिक्षिका म्हणुन नोकरी करीत आहेत त्यांचे चारही मेव्हणे यांचा सुद्धा तात्यांवर अतिशय प्रेम होते. कैलासवासी तात्यांना एक मुलगा व एक मुलगी असून तात्यांचा मोठा मुलगा चिरंजीव प्रफुल हा आय एस एस आर पुणे या संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण घेऊन जमनालाल बजाज मुंबई येथे एमबीए शिक्षण पूर्ण करून कोटक महिंद्रा बँकेत मोठ्या पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहे व मुलगी कु. वैष्णवी ही बी ई मेकॅनिकल शाखेतून पदवी प्राप्त करून कॅम्पस सिलेक्शन द्वारे चांगल्या कंपनीत नोकरीला मुबई येथे कार्यरत आहे .तात्यासाहेब यांनी नोकरीची सुरुवात जिल्हा बियाणे अधिकारी या पदापासून सुरु करून विविध ठिकाणी जसे तालुका कृषी अधिकारी शिरपूर ,तंत्र अधिकारी धुळे, तालुका कृषी अधिकारी अंमळनेर, तालुका कृषी अधिकारी सटाणा ,तालुका कृषी अधिकारी दिंडोरी, तंत्र अधिकारी विभागीय गुणवत्ता नियंत्रण ,पदोन्नतीने वर्ग 1 पदावर बुलढाणा येथे आय डब्ल्यू एम पी प्रकल्प अधिकारी ,कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे व आता शेवटच्या दोन वर्षासाठी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी नाशिक या पदावर सहा महिन्यापासून हजर झालेले होते. परवा दिनांक 9/3/ 25 रोजी त्यांचा 57 वर्ष पूर्ण होऊन 58 व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेले होते कैलासवासी तात्यासाहेब यांना चार वर्षापासून खोकल्याचा आजार सुरू झालेला होता त्यासाठी काही दिवस त्यांनी दुखणे अंगावर काढून नंतर स्थानिक नाशिक मधील तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऊपचार सुरू केलेले होते. त्याचबरोबर मुंबई येथील कार्पोरेट हॉस्पिटल फोर्टिस या दवाखान्याची दोन वर्षापासून डॉक्टर श्री.भोजनी या संधिवात तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार सुरू होते .त्यांना फुफुसाचा संधिवात झाल्याचे निदान झालेले होत फुफुसाचा संधिवात हा लाखांमधील एखाद्या व्यक्तीस हा आजार होतो दुर्दैवाने त्या लाख व्यक्तींमध्ये तात्याचा समावेश झालेला होता दर महिन्याला उपचारासाठी मुंबई येथे ते जाऊन विविध तपासण्या करून उपचार सुरू होते. परंतु नंतर हा आजार बळावत गेला होता. त्यांचे फुफ्फुस हळूहळू निकामी होत गेले नाशिक मध्ये चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी पंधरा दिवस उपचार घेतले व आम्ही सर्व मित्रमंडळी श्री एस आर पाटील साहेब दिलीप देवरे साहेब जगदीश पाटील साहेब,शिंदे साहेब व झालसे सर व मी तसेच त्यांचे कुटुंबीय ,त्यांचे शालक ,त्यांचे सासरे या सर्वांच्या निर्णयाने मागील एक महिन्यापूर्वी त्यांना मुंबई येथील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला व मागील एक महिन्यापासून ते त्या ठिकाणी उपचार घेत होते. जगाच्या पाठीवर फुफुसाच्या संधिवात साठी उपलब्ध असलेले सर्व वैद्यकीय उपचार त्या ठिकाणी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून केलेले होते. परंतु दुर्दैवाने त्यांना यश आले नाही व आपल्या सर्वांचे प्रयत्नांना यश आले नाही. त्यांच्या या आजारपणात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या निलु वहिनी व त्यांचे चिरंजीव प्रफुल यांनी अहोरात्र प्रयत्न केलेत. जेव्हापासून ते नाशिक येथे ऍडमिट होते तेव्हापासून आमच्या समक्ष नाशिक व मुंबई येथे त्यांचा मुलगा हा कायम त्यांच्या सहवासात 24 तास होता व तात्यांची सुश्रुषा करीत असतात करीत होता .हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे .कधी कधी पुत्र जन्म पोटी यावा तो कैलासवासी तात्यासाहेब यांच्या मुलासारखा. तात्यासाहेब यांच्या आईला सुद्धा दुर्धर आजार जडला होता. त्या आजारात तात्या यांनी अक्कांची सेवा अगदी मनोभावे एक मुलगी होऊन आईची सेवा त्यांनी केलेली होती .तो तात्यासाहेब यांनी त्यांच्या हे आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. तसेच तात्या त्यांच्या सर्व बहिणी, मेव्हणे ,भाचे, भाच्या यांना अतिशय प्रेमाने त्यांनी जे सांगितले असेल ते करीत होते जसे तात्या घरामध्ये व सासरकडील मंडळींमध्ये लोकप्रिय होते त्याच पद्धतीने सर्व शासकीय अधिकाऱ्यांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा तात्यासाहेब ही एक दिलदार व्यक्ती कोणाच्याही सुखदुःखामध्ये धावून जाणारी, वेळप्रसंगी स्वतःच्या खिशाला झळ देऊन पदरमोड करून कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व आज रोजी आपल्यामध्ये हयात नाही याची खंत वाटते त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये 57 वर्षाच्या कालावधीत कोणाला दुखावले असं व्यक्ती शोधून सापडणार नाही असे मला वाटते तात्यांनी त्यांच्या शेतीमध्ये मोजे शिरसमणी तालुका कळवण येथे बागायती शेती विहीर बांधून पॉलिहाऊस शेडनेट उभारून उत्कृष्ट आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतीत विविध प्रयोग करत होते .आम्ही मित्र कंपनी घरी तात्यावर रागावलो तरी तात्या कधीच आमच्यावर रागवत नव्हता. तो त्याच्या विचारावर ठाम असायचा .कोणी काहीही सल्ला दिला तो पूर्ण ऐकून घ्यायचा परंतु त्याच्या मनाने जो ठाम निश्चय केलेला असेल त्या निर्णयापासून तो ढळत नव्हता. ऐकावे जनाचे परी करावे मनाचे या उक्तीप्रमाणे त्यांचे वागणे होते .मित्रा तू एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाशील असे वाटत नव्हते .परंतु नियती पुढे कोणाचे काही चालत नाही हेच शेवटी खरे आहे .तात्या जसा भावनिक होता तसा तो धार्मिक वृत्तीचा सुद्धा होता आयुष्यभर त्याने कधीही मांसाहार केला नाही .किंवा मद्यप्राशन केले नाही .व ग्रामीण भाषेत म्हणतात तसे त्यांना सुपारीच्या सुद्धा व्यसन नव्हते. असा उंमद्या व्यक्तिमत्त्वाचा आमचा सहकारी मित्र यास लाखातील एखाद्या होणाऱ्या आजारामध्ये परमेश्वराने त्यांचा समावेश केला व त्यांना आमच्या सर्वांपासून हिरावून नेले जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला या म्हणीचा सत्यतेचा प्रत्यय तात्याच्या निधनाने नक्कीच आलेला आहे. तात्या सर्व आई ,बहीण, मेव्हणे ,वहीनी ,मुले, शालक सासरे ,मामी,त्यांच्या तात्यांच्या मावशी काका या सर्वांची मनधरत व सांभाळत असताना त्यांनी त्यांच्या शरीरयष्टीकडे दुर्लक्ष केले त्यांनी स्वतःची कधीच काळजी केली नाही ती दुसऱ्यांसाठी नेहमी धावत राहिले व धावता दावता एका ठिकाणी नियतीने त्यांना थांबवलं असे वाटते. देवा तुझ्या दाराला उंबराच नाही असे वाटते .परवा 9 /3/25तारखेला त्यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही आमचे मित्र एस आर पाटील साहेब देवरे साहेब व मी परिवारासह त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी गेलो
आम्ही त्यांचा 57 वा वाढदिवस हॉस्पिटलमध्ये साजरा केला .त्यावेळी तात्यांना एकदम गहिवरून आले होते. आम्हा सर्वांना हात जोडून नमस्कार केला व सर्वांचे आभार मानले .तात्यासाहेब यांचा आम्हास तो शेवटचाच नमस्कार असेल असे आम्हाला कोणालाच वाटले नव्हते व त्यांच्या चिरंजीवला सांगितले या सर्वांची जेवनाची व्यवस्था कर .म्हणजे तात्यासाहेब शेवटच्या घटका मोजत असताना सुद्धा दुसऱ्यांचीच काळजी करीत होता. तात्या साहेबांसारखा दुसरा मित्र होणे जवळपास अवघड आहे अशा व्यक्तीमत्वाला देवाने आमच्यापासून हिरावून नेलं ही सल मात्र आमच्या मनात कायम राहील तात्यांच्या जाण्याने शिरसाठ कुटुंबीय शिरसाठ परिवार व सोनवणे कुटुंबीय विशेष करून मामा, मामी ,दादा ,बाळा ,त्यांच्या सौ. तात्यांचे चारही मेव्हणे ,बहिणी, भाचे या सर्वांना हे आभाळाएवढे दुःख पेलण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो व निलूवहीणी यांना प्रफुल व वैष्णवी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची शक्ती देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व कैलासवासी तात्यासाहेब यांना माझ्या वैयक्तिक खैरणार परिवाराच्या वतीने व मित्रपरिवारांच्या कुटुंबाच्या वतीने तसेच खात्यातील विविध वर्ग एक अधिकारी संघटना ,वर्ग दोन अधिकारी संघटना, कृषी अधिकारी संघटना ,कृषी पर्यवेक्षक संघटना ,कृषी सहाय्यक संघटना ,लिपिक संघटना ,अनुरेखा संघटना ,चतुर्थ श्रेणी संघटना या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो असे मी परमेश्वर चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो ओम शांती शांती शांती आपले शोकाकुल तात्यासाहेब यांचा मित्र परिवार व कुटुंबीय
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा