गंगापूर धरणातील पाणीसाठा 50 टक्क्यावर कडक उन्हामुळे पाणी साठ्यात होते कपात.

जिल्ह्यातील धरणसाठा आला ५० टक्क्यांवर
नाशिक जन्मत प्रतिनिधी. गेल्या आठ दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील तापमान वाढले असून. नाशिक शहरात देखील तापमानाचा पारा 36 37 च्या वर गेलेला आहे. गंगापूर धरणातील मुबलक पाण्याचा साठा 50% वर आला आहे नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा असे महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
पाण्याच्या पातळीत घट हो त असली तरी, यंदा पहिल्यांदाच मार्चच्या मध्यान्ही पर्यंत धरणामध्ये ५० टक्के इतका समाधानकारक साठा अजुनही शिल्लक असल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला आहे. अजुन तीन महिने हा साठा जपून वापरण्याचे आव्हानही या निमित्ताने कायम आहे. यंदा पावळ्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील २४ लहान, मोठे धरणे ओव्हरफ्लो झाली होती. पावसाच्या सातत्याच्या जोरामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीतही मोठी वाढ झाली होती. ऑक्टोंबर अखेरपर्यंत पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने नोव्हेंबरमध्येच धरणांमध्ये ९९ टक्के जलसाठा होता. नदी, नाले दुथडी भरून वाहिले, शेतकऱ्यांच्या विहीरींना भरपूर पाणी असल्याने रब्बीच्या पिकांसाठी शेतकऱ्यांची आवर्तनाची मागणी घटली. परिणामी जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत धरणामध्ये ७० ते ७५ टक्के इतका साठा कायम राहिला.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील धरणामध्ये अशाप्रकारे पाणी आहे ते पुढील प्रमाणे.
मार्च महिन्यात मात्र उन्हाचा तडाखा वाढला तसेच आरक्षणानुसार आवर्तन सोडण्यात आल्याने साठ्यात घट होवू लागली आहे. बाष्पीभवन, धरणातील गळती व पाण्याच्या चोरीमुळे मार्चच्या दुसन्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील परणामध्ये ४९ टक्के जलसाठा कायम आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा १२ टक्क्यांनी अधिक असून, त्यामुळे टंचाईचे संकट टळण्यास मदत होणार आहे, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापुर धरणात ७३.२७ टक्के तर धरण समुहात ६४.४८ टक्के इतका साठा शिल्लक असून, गौतमी गोदावरीत १६ टक्के साठा आहे. पालखेड धरण समुहात ५३ टक्के इतका जलसाठा आहे. दारणा परणात ६६ टक्के तर मुकण्यात ७० टक्के, चणकापूर ५५.१३, हरणबारीत ६३ व सर्वात मोठ्या असलेल्या गिरणा धरणात २३ इतके जलसाठा शिल्लक आहे.