कृषीवार्ता

नागापूर पानेवाडी शिवारात वीज महामंडळाच्या चुकीमुळे लाखो रुपयांचे. कांद्याचे रोपे जळून खाक

शेतकरी वर्गामध्ये संताप. वीज मंडळांनी नुकसान भरून देण्याची मागणी.

नासिक जनमत  समाधान सोमासे प्रतिनिधी  धोटाणे, नागापूर पानेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना बोर्डाने विजपुरवठा बंद राहिल अशी पुर्व सुचना न दिल्याने २०/१/२०२५ सोमवारी पासून सकाळी ०७:४०तेसंध्या.०३:४०वाजेपर्यंत लाईट असते म्हणून कांदे लागवड केली.. दरम्यान लोड शेडिंग अचानक केल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मात्र२०तारखेला सोमवारी दुपारी १वाजता विजपुरवठा बंद झाला.अधुनमधून असा विजपुरवठा खंडित होत असतो, या भरवश्यावर कांदे लागवड चालू राहीली.दोन वाजता वायरमनला फोन लावून कांदे लागवड चालू आहे अशी माहिती दिली असता ते म्हणाले थोड्या वेळात लाईट येईन.३३केव्हीवर काम चालू आहे.परंतू संध्याकाळी ३:४०वाजले तरीही विज पुरवठा दिलाच नाही . दसऱ्या दिवशी म्हणजे आज मंगळवारी सकाळी विजपुरवठा ७:४०ते८:००वाजेपर्यंत म्हणजे फक्त २०मिनीटे विजपुरवठा दिला .आठ वाजेपासून आम्ही शेतकरी फोन लावतो तर उत्तर एकच यायचे “काम चालू आहे ,

 

 

 

तेव्हा आम्ही लागवडीचे फोटो त्यांना पाठविले.काल लावलेले एकर भर कांदे पाणी भरण्यासाठी कमीत कमी चार ते पाच तास लागतात. यामुळे सकाळी लाईट देणे गरजेचे होते .बारा वाजता विजपुरवठा दिला. बाराच्या पुढे एक एक वाफा भरणे सुरू झाले परिणामी जे व्हायचे तेच झाले पावणे चार वाजता विजपुरवठा वेळापत्रकानुसार बंद झाला आणि आजही कालचे लावलेले काही कांदेवाफे भरणे बाकी राहूनच गेले.विज पुरवठा बंद राहिल अशी पुर्व सुचना दिली असती तर आम्ही कांदे लागवड एक दिवस थांबविली असती..मनस्ताप व नुकसान झाले नसते.दिवसभराच्या उन्हात कांदा रोप मरते म्हणून चार दिवस थांबून दिवसाच्या वेळापत्रकानुसार कांदे लावले जाते .

 वीज मंडळांनी झालेले नुकसान भरून देण्याची मागणी. संतप्त शेतकऱ्यांनी केलेले आहे. सरकारने यात लक्ष घालन महत्त्वाचे आहे. व्हाट्सअप किंवा फोनवर मेसेज करून कल्पना देणे  महत्त्वाची आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे