गोदावरी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी दांडी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित गोदा रन संपन्न*

*गोदावरी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी दांडी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित गोदा रन संपन्न*
*नाशिक, जन्मत दि.१३ फेब्रुवारी :-* दांडी पौर्णिमेचे औचित्य साधत नाशिक रनर्सकडून स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सहा किलोमीटर अंतराची गोदा रन संपन्न झाली. या गोदा रनची सुरुवात रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आयोजित गोदा आरतीनंतर करण्यात आली.
या सोहळ्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंदार जानोरकर यांनी यशश्वि नियोजन केले व रामतीर्थ गोदावरी आरती सेवा समिती, नाशिकचे प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फड यांनी मदत केली.
गोदावरी आरती नंतर डॉक्टर मनिषा रौंदळ सर्व यांनी रनर्सचे वॉर्म अफ घेतले. त्यानंतर पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सर यांच्या हस्ते झेंडा दाखवून गोदा रन ची सुरुवात करण्यात आली. यावेळी “गोदावरी माता की जय”, “स्वच्छ गोदा सुंदर गोदा”, “गोदामाई ची स्वच्छता आपली जबाबदारी” हा जयजयकार करत गोदा रन ची सुरुवात झाली. गंगा घाटावर बुधवारचा बाजार असल्याकारणाने हा रन सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
रामकुंड , तपोवन मार्गे रामसृष्टी उद्यान येथील भव्य दिव्य श्रीराम मूर्तीस अभिवादन करून तपोवन मार्गे मोदकेश्वर मंदिर यशवंत महाराज पटांगण येथे रन ची समाप्ती झाली. सहा किलोमीटर रन सर्वांनी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.
यावेळी सर्व नाशिककर मोठ्या संख्येने ,सहकुटुंब या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले . डाऊन सिंड्रोम असूनही उत्तम डान्सर ट्रेकर विजय पाटील हा मुलगा देखील या रन मध्ये सहभागी झाला , त्याबद्दल विशेष सत्कार माजी अध्यक्ष नारायण वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी सर्व नाशिक रनर चे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.