व्ही एन नाईक . संस्थेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक धोंडीबा डोंगरे यांचे निधन. वंजारी समाजातला हिरा आनंतात विलीन. .
नाशिक जन्मत प्रतिनिधी वसंतराव नाईक नासिक येथील संस्थेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक. धोंडीबा भागुजी डोंगरे वय 73 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. जेलरोड येथील दसक पंचाक समशान भूमी .या ठिकाणी आज त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
नांदगाव तालुक्यातील वेहळगाव येथील धोंडीबा डोंगरे हे व्ही एन नाईक संस्थे मध्ये शिक्षक पदावर रुजू झाले होते. अतिशय शिस्तबद्ध आणि संस्थेसाठी मोठे योगदान देणारे ते व्यक्तिमत्त्व होते. अनेक शाळेवर त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम बघितले. व्ही एन नाईक संस्थेला आपल्या पगारातून व्यक्तिगत जेवढे ही योगदान देता येईल तेवढे योगदान त्यांनी शाळेसाठी दिले. वेह ळ गाव येथे शाळेतील विद्यार्थी झाडाखाली बसत असताना त्यांनी बघितले. त्याच वेळेस त्यांनी स्वतः इतर गावातील अनेक मान्यवरांकडे भेटी देऊन वर्गणी गोळा केली व या माध्यमातून त्यांनी वेळगाव येथे पाच शाळेच्या खोल्या बांधल्या. समाजावर त्यांचे अतूट प्रेम होते. विद्यार्थ्यांवर त्यांचे खूप प्रेम होते विद्यार्थी अनेक विद्यार्थी त्यांनी मोठे मोठे घडवले. अनेक ठिकाणी मोठ्या पदावर देश सेवा करत आहे. मुलगा नसल्याने मुली व जावई हेच आपले मुले आहेत. असे ते मानत. लिखाणामध्ये ते तरबेज होते. अनेक वृत्तपत्रांना त्यांनी लिखाण करून अनेक लेख देखील दिलेले आहेत. झाडे लावून वृक्षावरील आपले प्रेम त्यांनी व्यक्त केलेले आहेत. व्ही एन नाईक संस्था कशी पुढे जाईल याकडे त्यांचे नेहमी लक्ष केंद्रित असायचे. नाशिक जिल्ह्यातील अनेक शाळांना त्यांनी भरभरून विद्यार्थी व शाळेला मोठे योगदान दिलेले आहे.
दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी चे देहवासन झाले होते. तेव्हापासून ते खचले होते. समाजकार्याची त्यांना मोठी आवड होती. पेन पुस्तके वह्या नेहमीचे घेऊन देत असत. अनेक गरीब विद्यार्थी त्यांनी घडवले.
गेल्या महिन्यापासून ते आजारी होते.. काल रात्री त्यांची अकरा वाजून 30 मिनिटांनी प्राणज्योत मालवली.
अंत्यसंस्कार संस्थेतील अनेक मान्यवर नातेवाईक यावेळेस उपस्थित होते. सरांच्या तिघी मुलींनी त्यांना अग्नीडाग दिला. व पाणी दिले. सरांनी आपले संपूर्ण कुटुंब सुशिक्षित केलेले होते. एक मुलगी डॉक्टर एक प्रोफेसर. आहे. जावई देखील एनडीसी बँकेतसाहेब आहेत.तसेच एक जावई डॉक्टर आहेत. मातोश्री कॉलेज येथे जावई निलेश घुगे हे प्राचार्य आहेत.
त्यांच्या निधनाने वंजारी समाजाने एक हिरा गमावलेला आहे. अतिशय गोड भाषा तसेच सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही हे खरे वाटत नसल्याचे श्रद्धांजली देताना आणि मान्यवरांनी सांगितले. निवृत्त उपनिबंधक डोंगरे सर यांचे ते बंधू होते.