30 हजार रुपयांची लाच, महिला ग्रामसेविकेवर गुन्हा. घोटी येथील हा प्रकार.

30 हजार रुपयांची लाच, महिला ग्रामसेविकेवर गुन्हा
नाशिक जन्मत दिवसेंदिवस विविध क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचारा कमी होत नसून वाढत असल्याचे दिसत आहे काल नाशिक जिल्ह्यात दोन ठिकाणी लाच लुचपत विभागाने कारवाई केली. घटना इगतपुरी तालुक्यातील व येवला तालुक्यातील नगरसुल येथील आहे . सत्तर हजार पगार तरी पैशांची मागणी घोटी । इगतपुरी तालुक्यातील भरवजच्या ग्रामसेविका सुवर्णा आहेर यांच्याविरुद्ध ३० हजारांची लाच स्वीकारल्याने घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आहेर यांना मासिक ७० हजार रुपये पगार आहे.
यातील तक्रारदार शेती व जमीन खरेदी- विक्री खासगी एजंट म्हणून व्यवसाय करतात. तक्रारदार व त्यांचे मित्र यांनी आदिवासी जमीन बिगर आदिवासी व्यक्तीच्या नावे खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी, नाशिक येथे अर्ज केला आहे. या अनुषंगाने ग्रामपंचायत भरवज यांच्याकडून ठराव घेण्याबाबत तहसीलदार इगतपुरी यांनी आदेशित केले. तक्रारदार याबाबत ग्रामपंचायतीत विचारणा करण्यास गेले असता ग्रामसेविका सुवर्णा आहेर यांनी त्यांच्याकडे ठराव देण्याच्या मोबदल्यात ३० हजारांची पंचांसमक्ष मागणी करून मंगळवारी ३० हजारांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली. त्यांच्याविरुद्ध घोटी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे तपास करत आहे