ब्रेकिंग

अल्पवयीन कारचालकाचा ताबा सुटला; 3 वाहनांना दिली धडक; पादचारी जखमी

अल्पवयीन कारचालकाचा ताबा सुटला; 3 वाहनांना दिली धडक; पादचारी जखमी

 

प्रतिनिधी | नाशिक जन्मत

अल्पवयीन मुलांना गाडीचे ड्रायव्हिंग चे लायसन नसताना देखील आई-वडील मुलांच्या ताब्यात चार चाकी वाहन देत असल्याने  अनेकदा अपघात झाले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. पोलिसातर्फे -वडिलांवर कारवाई केली जात असली तरी अशा घटना प्रामुख्याने अनेक शहरात घडत आहे अशीच घटना काल नाशिक शहरात घडले आहे

काल नाशिकच्या शालिमार परिसरात अल्पवयीन मुलाने कार चालवायला घेत वर्दळीच्या ठिकाणी चालविण्याचा प्रयत्न करताना तीन वाहनांसह एका पादचाऱ्याला धडक दिली. त्यात पादचारी गंभीर जखमी झाला तर तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बडी दर्गा येथील उतारावर हुसैनी चौक, पिंजारघाटरोड, जुने नाशिक येथे हा अपघात घडला. भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरोधात हिट ॲण्ड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती आणि उज्ज्वला थोरात (रा. जुने नाशिक) यांच्या तक्रारीनुसार बडी दर्गा येथे उतारावर हुसैनी चौकात एमएच ०३

 

मुलाच्या वडिलांवर कारवाई अल्पवयीन मुलाकडे कार दिल्याने पोलिसांनी मुलाच्या पालकांना बोलावून घेतले. त्यांच्यावर हिट अँड रन आणि जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

बीएस ९०१५ कार एक मुलगा चालवत होता. कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याने जाणारे किरण वझरे (४३) यांना कारने धडक दिली. वझरे खाली पडल्यानंतर कारसह मुलगा पळून जात असताना त्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या तीन दुचाकींना धडक देत नुकसान केले. काही नागरिकांनी कारचा पाठलाग केला. कारचालकाने

 

गाडी न थांबवता म्हसरुळ टेक, संभाजी चौकाकडे पळून जात असताना गाडीचा वेग कमी करत कार सोडून तो पळून गेला.

 

कार भिंतीवर आदळल्याने दुर्घटना टळली : पादचाऱ्याला धडक देऊन कार म्हसरुळ टेक, संभाजी चौकाकडून डिंगरआळीच्या चढावर नेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार भिंतीवर आदळल्याने लॉक झाली. ती कार एकाच जागी थांबून राहिल्याने मोठी दुर्घटना टळली. कारचा दरवाजा उघडून कारचालक पळून गेला. सुदैवाने कार चढावावर नेली, उतारावर घेऊन गेला असता मोठी जीवितहानी घडली असती असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे