विद्यार्थिनीची आत्महत्या लग्नास नाकार मामाच्या मुलाशी ६ वर्षे प्रेमसंबंध, संशयितावर गुन्हा
प्रतिनिधी |नाशिक जनमत
मामाच्या मुलासोबत ६ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या -> बी.एस्सी. नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या युवतीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर संशयित प्रियकरासह त्याच्या आई-वडिलांच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी – गुन्हा दाखल करण्यात आला. १९ मे रोजी युवतीने स्कार्फच्या साह्याने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता.
ललिता थोरात (रा. अंबड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी कस्तुरी थोरात (२३) ही बी.एस्सी. नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाला मुंबई येथे शिक्षण घेत होती. सुट्टीनिमित्त घरी आली होती. भावाचा मुलगी ऋतिक हिवाळेसोबत सहा वर्षांपासून तिचे प्रेमसंबंध होते. ऋतिकचा २० मे रोजी साखरपुडा ठरल्याचे फॅमिली ग्रुपवर समजले. कस्तुरीने ऋतिकला घरी बोलावले. आपल्या लग्नाला घरच्यांचा विरोध आहे. आत्याची मुलगी असल्याने लग्न करता येणार नाही, असे सांगत त्याने तिचा मोबाइल नंबर ब्लॉक केला. त्याचे आई-वडील त्याला घेऊन त्यांच्या
मूळगावी गेले. ऋतिकने असे का केले, आम्ही एकमेकांना प्रॉमिस केले होते. शिक्षण झाल्यानंतर लग्न करणार होतो, असे बोलत ती सारखी रडत होती. दुसऱ्या नंबरवरून फोन केला असता ऋतिकच्या आईने फोन घेत शिव्या दिल्याचे तिने सांगितले. तेव्हापासून ती तणावात होती. १९ मे रोजी तिने दुपारी १२ वाजता आई कचरा टाकण्याकरिता बाहेर गेल्याचे बघून दरवाजे आतून बंद करून घेत किचनमधील फॅनला स्कार्फने गळफास लावून घेत आत्महत्या केली, अशी तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे तपास करत आहे.