नाशिक मध्ये पुन्हा खून. शिवाजीनगर सातपूर मध्ये झाला खून.

—
सातपूरमध्ये बहिणीला प्रपोज केल्याच्या कारणावरून युवकाचा खून; चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल
नाशिक, जन्मत २6 मे: सातपूर परिसरातील शिवाजीनगर दत्त मंदिर रोडवर काल (२६ मे) रात्री नऊच्या सुमारास बहिणीला प्रपोज केल्याच्या कारणावरून एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. नसीम शाह (वय १९) असे मृत युवकाचे नाव असून, याप्रकरणी आदित्य वाघमारे व त्याच्या तीन साथीदारांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीम हा कार्बन नाका, शिवाजीनगर परिसरात राहतो. रात्री तो दत्त मंदिर रोडमार्गे कार्बन नाका, शिवाजीनगरकडे जात असताना संशयितांनी त्याला अडवले. “बहिणीला प्रपोज करतोस का?” असे म्हणत चौघांनी त्याच्यावर हल्ला चढवला आणि बेदम मारहाण केली. नसीम खाली कोसळल्यानंतर त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
जखमी अवस्थेत त्याला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असून, अधिक तपास सुरू आह