कृषीवार्ता

पालखेड धरण व डावा कालवा बिगर सिंचन आवर्तनाची* *जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी भेट देवून केली पाहणी*

 

 

*पालखेड धरण व डावा कालवा बिगर सिंचन आवर्तनाची*

*जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी भेट देवून केली पाहणी*

 

*नाशिक, दिनांक 27 मार्च, 2024  वृत्तसेवा) :* पालखेड डाव्या कालव्याद्वारे व कादवा नदीद्वारे दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यातील गावांना पिण्यासाठी आरक्षित केलेले आकस्मिक आरक्षणाचे पाणी देण्यासाठी त्याचप्रमाणे मनमाड नगरपरिषद, येवले नगरपरिषद, येवला तालुक्यातील 38 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, मध्य रेल्वे मनमाड व ग्रामपंचायत आंबेबाव या शासनमान्य पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा करण्यासाठी 26 मार्च 2024 ते 9 एप्रिल 2024 या कालावधीत पालखेड डाव्या कालव्याचे बिगर सिंचन आवर्तन सोडण्यात आलेले आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज पालखेड धरण व पालखेड डावा कालव्यास भेट दिली. अशी माहिती पालखेड पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता अ.बा. रौंदळ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

सदर भेटीच्या वेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या समवेत कार्यकारी अभियंता वैभव भागवत, उप अभियंता प्रशांत गोवर्धने यांच्यासह महसूल, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी व पोलीस अधिकारी उपस्थित होते. आवर्तन कालावधीत कालव्यालगतचा वीज पुरवठा खंडीत करणे, पोलीस बंदोबस्त पुरिवणे, राज्य राखील दलाची तुकडी बंदोबस्तासाठी उपलब्ध करून देणे, बंधाऱ्यांवरील अनधिकृत बांधकाम काढून टाकणे इत्यादी कामांचा आढावा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी घेतला. आवर्तनादरम्यान पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा, कालव्यालगतच्या मोटारींचा वीज पुरवठा तात्काळ खंडीत करणे तसेच आवर्तनादरम्यान अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे