टू कॉन इन्फ्रा एन डी सी ए प्रोफेशनल लीग 2 जगदाळे वॉरीअर्स , जे सी रायडर्स व पंचवटी वॉरीअर्सचे दुसरे विजय
ट्रू कॉन इन्फ्रा एन डी सी ए प्रोफेशनल लीग 2
जगदाळे वॉरीअर्स , जे सी रायडर्स व पंचवटी वॉरीअर्सचे दुसरे विजय
ट्रू कॉन इन्फ्रा प्रायोजित नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, एन डी सी ए प्रोफेशनल लीग 2 मध्ये दुसऱ्या दिवशी चुरशीच्या लढतीत जगदाळे वॉरीअर्स व मराठा वॉरीअर्सने आपले साखळी सामने जिंकले. तिसऱ्या दिवशी जगदाळे वॉरीअर्सने दुसरा व पंचवटी वॉरीअर्सने आपला पहिला सामना जिंकला. चौथ्या दिवशी जे सी रायडर्स व पंचवटी वॉरीअर्सने आपले सामने सहज जिंकत दुसरे विजय नोंदविले.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर दुसऱ्या दिवशी पहिल्या सामन्यात जगदाळे वॉरीअर्सने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १७६ धावा केल्या. आशिष पुरीने ५४ तर सनी काकडेने फटकेबाज नाबाद ५२ धावा केल्या. सुबोध कोठूळेने २ बळी घेतले. उत्तरादाखल जे सी रायडर्सने ९ बाद १७३ इतकी मजल मारली . त्यामुळे जगदाळे वॉरीअर्सने ३ धावांनी विजय मिळवला .
जे सी रायडर्सच्या ज्ञानेश्वर पेंढारेने ४० , कुणाल महाजनने ३३, दिनेश ठाकूरने २८ व नीलेश चव्हाणने २५ धावा केल्या. जगदाळे वॉरीअर्सच्या अकील शेख, राहुल पाटील व अनिल चव्हाण यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात कमलेश पालेकर व विश्वेश एस यांच्या अष्टपैलु खेळाच्या जोरावर मराठा वॉरीअर्सने ए बी इलेवनवर १ गडी राखून विजय मिळवला. ए बी इलेवन ने प्रथम फलंदाजी करत १०९ धावा केल्या . संतोष दिंडेने ३९ व मिलिंद गांगुर्डेने २५ धावा केल्या . मराठा वॉरीअर्सच्या विश्वेश एसने ४ तर कमलेश पालेकरने ३ बळी घेतले. विजया साठीच्या ११० धावा करताना कमलेश पालेकरने नाबाद ४६ व विश्वेश एसने २६ धावा केल्या . ए बी इलेवनच्या सचिन आहेर , अमोल पवार व नीलेश सिंग यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
तिसऱ्या दिवशी पहिल्या सामन्यात पंचवटी वॉरीअर्सने प्रो जंबो वर स्वप्नील राजपुतच्या अष्टपैलु खेळावर ४ गडी राखून विजय मिळवला. प्रो जंबोने प्रथम फलंदाजी करत १७७ धावा केल्या .दिनकर कांबळेने सर्वाधिक ५१ धावा केल्या. पंचवटी वॉरीअर्सच्या स्वप्नील राजपुतने ४ गडी बाद केले. विजया साठीच्या १७७ धावांत स्वप्नील राजपुतने ५६ व विशाल निकमने ३७ धावांचे योगदान दिले.
तर दुसऱ्या सामन्यात जगदाळे वॉरीअर्सने ग्रिफिन अकादमीवर ४० धावांनी विजय मिळवला. जगदाळे वॉरीअर्सने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १६७ धावा केल्या. आशिष पुरीने सर्वाधिक ७१ व मृणाल पंड्याने ३५ धावा केल्या. ग्रिफिनच्या समीर जोशी यांनी ३ गडी बाद केले. उत्तरादाखल ग्रिफिन अकादमीने १२७ इतकीच मजल मारली . त्यात मंगेश निर्भवणेने सर्वाधिक ६२ धावा केल्या. जगदाळे वॉरीअर्सच्या सनी काकडेने ३ बळी घेतले व जगदाळे वॉरीअर्सने दुसरा विजय मिळवला .
चौथ्या दिवशी पहिल्या सामन्यात मराठा वॉरीअर्सने प्रथम फलंदाजी करत ९ बाद १४० धावा केल्या. विश्वेश एसने ३४ व मॉन्टीने २६ धावा केल्या. जे सी रायडर्सच्या राजू डगले, भूषण नेमाडे , जितेंद्र शिंपी प्रत्येकी २ तर सुबोध कोठूळे व समीर कुलकर्णी प्रत्येकी १ बळी व विलास थोरात यांनी प्रभावी गोलंदाजी केली. विजयासाठीच्या १४१ धावा चेतन बिरारीसच्या ५४, दिनेश ठाकूर नाबाद ३४ व भूषण नेमाडे नाबाद २५ या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर आरामात पार करत जे सी रायडर्सने ६ गडी राखून मोठा विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात पंचवटी वॉरीअर्सने प्रथम फलंदाजी करत ८ बाद १७० धावा केल्या. अतुल पालकरने ४७ व गालिब पटेलने ३९ धावा केल्या. ए बी इलेवनच्या राहुल ठाकरे ,अमोल पवार व नीलेश सिंग ठाकूर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. उत्तरादाखल ए बी इलेवनने सर्वबाद ८० इतकीच मजल मारली . त्यात नीलेश सिंग ठाकूरने सर्वाधिक २८ धावा केल्या. पंचवटी वॉरीअर्सच्या दीपक पाटील, गणेश पवार , सचिन हांडगे व गालिब पटेलने प्रत्येकी २ तर स्वप्नील राजपुत व विजय ठाकूरने प्रत्येकी १ बळी घेत पंचवटी वॉरीअर्सला ९० धावांनी मोठा विजय मिळवून दिला.