देश-विदेश

मतदार ओळख पटविण्यासाठी 12 प्रकारची* *कागदपत्रे पुरावा म्हणून ठरणार ग्राह्य*

 

*मतदार ओळख पटविण्यासाठी 12 प्रकारची*
*कागदपत्रे पुरावा म्हणून ठरणार ग्राह्य*

*नाशिक, दिनांक 24 मार्च, 2024 (नाशिक जनमत  वृत्तसेवा) :* लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांना छायाचित्रासह ओळखपत्र देण्यात आले आहे. मतदान केंद्रावर मतदार आपली ओळख पटविण्यासाठी छायाचित्र मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु जे मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) सादर करू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी मतदार ओळख पटविण्यासाठी 12 प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य ठरणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने 19 मार्च 2024 च्या आदेशान्वये घोषित केले आहे.

*मतदाराची ओळख पटविण्यासाठी अशी आहेत 12 प्रकारची नमूद कागदपत्रे*

1. आधार कार्ड (Aadhaar Card)
2. मनरेगा जॉब कार्ड (MNREGA Job Card)
3. बँक/पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक (Passbooks with photograph
issued by Bank/Post Office)
4. कामगार मंत्रालयाच्या योजने अंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड (Health insurance
Smart Card issued under the scheme of Ministry of Labour),
5. वाहन चालक परवाना ( Driving License)
6. पॅन कार्ड ( Pan Card).
7. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड
(Smart Card issued by RGI under NPR)
8. भारतीय पासपोर्ट Indian Passport)
9. फोटोसह पेन्शन दस्तऐवज (Pension document with photograph)
10. केंद्र / राज्य सरकार / सार्वजनिक उपक्रम / पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी
केलेले सेवा ओळखपत्र (Service Identity Cards with photograph issued to employees
by Central / State Govt. / PSUs/Public Limited Companies)
11. खासदारांना / आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र (Official identity cards issued to MPs / MLAs / MLCs)
12. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र (Unique Disability ID (UDID) Card, M/o Social Justice & Empowerment, Government of India)

छायाचित्रासह मतदार ओळखपत्राव्दारे मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील कारकुनी त्रुटी, शब्दलेखनातील चुका इत्यादी किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात, असे आयोगाने म्हटले आहे. तसेच मतदाराचे नाव, तो ज्या ठिकाणी मतदान करीत आहे त्या मतदारयादीत आहे, परंतु त्याच्याकडे अन्य विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी यांनी वितरीत केलेले छायाचित्रासह मतदार ओळखपत्र असल्यास ते स्वीकारावे. छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे / पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील, असेही आदेशात नमूद केले आहे.

प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट (Origional Passport) आवश्यक असणार आहे. मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा, मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदानाची तारीख व वेळ इत्यादी माहिती उपलब्ध होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदारांना फोटो वोटर स्लीप ऐवजी मतदार माहिती चिठ्ठी (Voter information Slip) वितरीत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सदर मतदार माहिती चिठ्ठी सर्व मतदारांना मतदानाच्या दिनांकाच्या किमान 5 दिवस आगोदर वाटप करण्याच्या सूचना आहेत. तथापि मतदारांना ओळखीचा पुरावा म्हणून मतदार माहिती चिठ्ठी ग्राह्य असणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असेही आदेशान्वये कळविण्यात आले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे