गोदान एक्सप्रेस चा डब्याला आग. पार्सल च्या डब्यातील वस्तू खाक.

नाशिक जनमत. काल दुपारी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर गोरखपुर गोदान एक्सप्रेस आली व काही वेळाने ती मार्गस्थ झाली परंतु काही मिनिटातच पुढे गेले असता गोदान एक्सप्रेसच्या पार्सल डब्यातून धुराचे लोट आणि आग दिसू लागली आणि मोठी खळबळ
उडाली रेल्वेच्या कंपार्टमेंट मध्ये असलेल्या प्रवाशांना घटना समजतात त्याची माहिती गार्डला देण्यात आली रेल्वे थांबतात महिला आणि दिव्यांग प्रवाशांनी घबराट झाल्याने उड्या मारून जी वाचवला या घटनेमुळे मोठा थरकाप उडाला होता काही तासातच आग आटोक्यात आली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. दरम्यान गोदान एक्स्प्रेस चुकीच्या ठिकाणी थांबल्यामुळे पाणी डब्यावर मारणे अवघड झाले. दरम्यान रेल्वेत असणाऱ्या आग विजवणाऱ्या यंत्रांनी आगीचे स्वरूप कमी केले. यानंतर रेल्वे पोलीस यांनी घटनास्थळावर धाव घेऊन अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली दरम्यान पार्सल बोगी बाजूला करून गोदान एक्सप्रेस पुढील प्रवासास मार्गस्थ झाली. या घटनेने नाशिक रोड परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली होती. ही आग का लागली तपास रेल्वे पोलीस यंत्रणा करीत आहे. आगीमध्ये दुचाकीसह अन्य साहित्य जळून खाक झाले.