शाहिरी प्रशिक्षण शिबिरात आनंदतरंग शाहीर गायकर यांचे व्याख्यान संपन्न!

कलावंत घोटी: शाहिरी प्रशिक्षण शिबिरात आनंदतरंग शाहीर गायकर यांचे व्याख्यान संपन्न!
कलावंत घोटी: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित इस २० दिवशीय शाहिरी प्रशिक्षण शिबिर जाफराबाद जिल्हा जालना येथे सुरू झाले असून नाशिक जिल्ह्यातील आनंदतरंगचे शाहीर उत्तम गायकर यांची प्रशिक्षक म्हणून निवड झाली .
सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित शाहिरी प्रशिक्षण शिबिर दि.०५/०३/२०२४ रोजी ९ व्या दिवशी व्याख्याते लोककलेचे गाढे अभ्यासक शाहीर श्री उत्तमराव गायकर नाशिक यांनी शाहिरी पोवाडे, लोकगीते, समर गीते बहु आयामी प्रात्यक्षिक सादर करून शाहिरी शिबिरार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना मोलाचे मार्गदर्शन केले .
महाराष्ट्र शासनामार्फत प्रतिवर्षी शाहिरी या प्रयोग सिद्ध कलांचे प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. या उपक्रमाद्वारे पारंपरिक लोककलेचे संगोपन व संवर्धनासोबत उमेदीच्या कलावंतांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येते. सन २०२४ साठी जाफराबाद जि. जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात २० शिबिरार्थींना प्रवेश देण्यात आला . असून महाराष्ट्रातील प्रतिभा संपन्न शाहीर तसेच या परंपरेचे सखोल अभ्यासक तज्ञ यांना शाहीर प्रशिक्षक म्हणून निमंत्रित करण्यात आलेले आहे.
या शाहिरी प्रशिक्षणात शाहीर बिहारीलाल राजपूत (जालना) शाहीर गुलाबराव नळणीकर(जालना )शाहीर दिलीप पिंपळे(जालना) प्राध्यापक शाहीर अजिंक्य लिंगायत (संभाजीनगर) शाहीर शिवाजी पाटील (जळगाव) शाहीर शिवाजी शिंदे (अहमदनगर) शाहीर विजय पांडे (अकोला) आनंदतरंग शाहीर उत्तम गायकर (नाशिक) शाहीर बाळासाहेब मालुसकर (पुणे) शाहीर सुभाष गोरे (सोलापूर) शाहीर आप्पासाहेब उगले (जालना) शाहीर सज्जन सिंग राजपूत (बुलढाणा) शाहीर रामदास कुरंगळ (बुलढाणा) शाहीर देवानंद माळी (सांगली) शाहीर यशवंत जाधव (संभाजीनगर) शाहीर ईश्वर मगर (बुलढाणा) शाहीर समशेर रंगराशाहीर समशेर रंगराव पाटील (कोल्हापूर) शाहीर बजरंग आंबी (सांगली) यांची सखोल अभ्यासक तथा तज्ञ प्रशिक्षक म्हणून निवड झाली .
शाहीर ते शाहीरी या विषयावर प्रशिक्षणार्थींना सखोल मार्गदर्शन करीत असताना संत कवी , पंत कवी ते डिजिटल जगाबरोबर शाहीरी समृद्ध करुन टिकवायची कशी ? यामध्ये स्वलीखित प्रबोधनात्मक गीत , शाहिरी गीते , पोवाडे, देशभक्तीपर गीते , लोकगीते सादर केली. व प्रशिक्षणार्थींकडून करवून ही घेतली.
यावेळी शिबिर संचालक शाहीर नानाभाऊ परिहार कोनडकर यांनी गायकर शाहिरांचा सन्मानाने सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी जेष्ठ कलावंत शेख युनुस भाई सह परिसरातील कलावंत उपस्थीत होते.