क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग
पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशा, लेझिम पथकासह जल्लोषात मराठी नववर्षाचे स्वागत*
शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांचा लक्षणीय सहभाग*

*पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशा, लेझिम पथकासह जल्लोषात मराठी नववर्षाचे स्वागत*
*शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांचा लक्षणीय सहभाग*
*नाशिक जनमत,दि.३० मार्च :-* गुढी पाडावा व मराठी नववर्षाच्या निमित्ताने यंदाच्या दहाव्या वर्षी नविन नाशिक परिसरात नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने काढण्यात आलेली नववर्ष स्वागत यात्रा जल्लोषात पार पडली. यावेळी पारंपरिक वेशभूषा,शंख पथक,ढोल ताशा, लेझिम पथकासह जल्लोषात मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांचा लक्षणीय सहभाग बघायला मिळाला.
गेल्या दहा वर्षांपासून नवीन नाशिक नववर्ष स्वागत समितीच्या वतीने शालेय संस्था,सामाजिक संस्था,मंडळ,जेष्ठ नागरिक संघ,ढोल व लेझीम पथक तसेच पारंपारीक वेशभुषेत सहभागी होणारे लहान मुले,महिला,वृध्द, यांच्या सहकार्याने स्वागत यात्रा काढण्यात येते. सध्याच्या असणाऱ्या विभक्त कुटुंब पध्दतीमुळे सणांचे संस्कार, त्यांची माहिती व उत्साह नविनीस योग्य प्रकारे देवु शकत नाही, त्यामुळे आपल्या संस्कृतीचे महत्व त्यांच्यापर्यंत योग्य प्रकारे मावू शकत नाही. त्यामुळे काही सण सर्वांनी एकत्र येवुन उत्साहाने साजरे करावे अशी कल्पना करून आपण नववर्ष स्वागत यात्राचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदविला.
सकाळी ६.३० वा. खुटवड नगर, धन्वंतरी कॉलेज अभियंता नगर, आदर्श नगर विखे पाटील शाळा येथून यात्रा आरंभ करण्यात आली. त्यानंतर पवननगर, उत्तमनगर ते माऊली लॉन्स येथे ९ वाजता समारोप करण्यात आला.
यावेळी आमदार सिमाताई हिरे, नाशिक कार्यवाह सुहास वैद्य,उद्योजक सचिन ठोके, संस्थपक अध्यक्ष सुनील कोटगी,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे,
उद्योजक बाजीराव पाटील, नववर्ष स्वागत यात्रा समिती नविन नाशिक परिसरचे अध्यक्ष सौ. सुरेखा विलास मटाले, कार्याध्यक्ष राजेंद्र (नाना)फड, कोषाध्यक्ष योगेश मांडे