पाणीपुरी विक्रेत्या व्यवसायिकाच्या पत्नीची एकलहरा रोड येथे हत्या.
नाशिक जनमत. शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस पोलीस प्रशासन व नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे काल दिनांक सहा रोजी नाशिक रोड येथील एकलहरा रोड येथे पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा अज्ञात इसमांनी घरात घुसून गळ्यावर चाकूचे वार करून खून केल्याची घटना घडलेली आहे याबाबत नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सुदाम रामसिंग बनेरीया .राहणार सामनगाव एक ल्हरा रोड यांनी सांगितले की ते दुपारी चार
वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत एकलहरा मेन गेट नाशिक रोड येथे पाणीपुरीचे व्यवसाय करत असतो. त्यावेळी त्यांची पत्नी घरी होती त्यांच्या पत्नीचे नाव क्रांती बनेरिया वय 25 व तसेच त्यांचा भाचा अभिषेक हे दोघे घरात होते त्याचवेळी अज्ञात इसमांनी अज्ञात करण्यासाठी बनेरीया यांच्या घरात प्रवेश करून क्रांती. बनेरिया याच्या गळ्यावर चाकूचे वार करून जीवे ठार मारले. तर फिर्यादीचा भाचा अभिषेक याला माराहान करून गंभीर जखमी केले आहे. या घटनेने सामनगाव रोड परिसरामध्ये खळबळ उडाली आहे घटनास्थळावरून एक धारदार चाकू जमा करण्यात आलेला आहे. गंभीर जखमी अभिषेक या सिविल हॉस्पिटल येथे उपचारासाठी ऍडमिट करण्यात आले आहे.. घटनास्थळावर नाशिक रोड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत. इत्यादी घटनास्थळावर हजर होते अधिक तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत सदर कुटुंब हे भाड्याच्या घरात राहत होते. आत्तापर्यंत घटनेच्या तपास लागलेला नाही. येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर गुन्हेगारीच्या घटना मध्ये नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी रस्त्यावर उतरून स्वतः पोलीस फाट्या सह गुन्हेगारी कमी करून गुन्हेगारांवर वाचक निर्माण करावा अशी मागणी नाशिक कर करत आहे