आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री निधीतून १२ लाखांपेक्षा जास्त मदत.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री निधीतून १२ लाखांपेक्षा जास्त मदत
अरुण हिंगमिरे
पत्रकार जातेगांव
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत
१ जुलै २२ ते 1 मार्च २३ या आठ महिन्यात नांदगाव विधानसभा मतदार संघातील गरजू रुग्णांना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या शिफारशी ने संवेदनशील मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीतून अर्थसहाय्य करण्यात आले.
मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्य व शासकीय सुविधा संबंधी मोफत सेवा आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत.
सोबतच विशेष शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी शिफारस करून रुग्णांना मदत केली जाते. मागील ८ महिन्यात आता पर्यंत १२.१०.००0 रुपयांचा निधी विविध रुग्णांना मिळाले आहेत.
याबाबत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे यांनी सदर माहिती पत्राद्वारे आमदार सुहास आण्णा कांदे यांना दिली.L