महाराष्ट्र

गरुड झेप प्रतिष्ठान ने रचला 14 00 दिवसाचा वाहतूक सुरक्षा अभियानायाचा नवीन जागतिक विक्रम.

गरुडझेप प्रतिष्ठान ने रचला १४०० दिवसाचा वाहतूक सुरक्षा अभियानाचा नवीन जागतिक विक्रम – सचिन पाटील (पोलीस अधिक्षक )

 

नासिक ला स्मार्ट सिटी चा दर्जा प्राप्त करायचा असेल तर वाहतूक सुरक्षे वर खूप काम करावे लागेल .

गरुडझेप प्रतिष्ठान गेली १४०० दिवस सलग नासिकला विविद ठिकाणी वाहतूक सुरक्षा प्रबोधन करत आहे .

त्यांच्या ह्या सामाजिक कार्याची दाखल जागतिक विक्रमात हि झाली आहे . डॉ संदीप भानोसे ह्यांच्या कार्यातून ध्येय निश्चिती , नियोजन ,चिकाटी , निस्वर्थ्पणा व सातत्य प्रकर्षाने जाणवते . इतर सामाजिक संस्थांनी सुधा ह्या कार्यातून प्रेरणा घ्यावी .असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक – ग्रामीण सचिन पाटील ह्यांनी केले

.

गरुडझेप प्रतिष्ठान गेली १४०० दिवस अर्थात २५ मार्च २०१८ ते २२ जानेवारी २०२२ नासिकला विविद ठिकाणी वाहतूक सुरक्षा अभियान सातत्यपूर्ण रीतीने राबवत आहे . आज पर्यंत अनेक शाळेत व कॉलेजात सुधा डॉ संदीप भानोसे ह्यांनी व्याख्याने दिली आहेत .हळू हळू समाजात परिवर्तन होताना दिसत आहे . हेल्मेट वापर वाढला आहे .वाहतूक नियम पाळण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच अपघातात सुधा मोठी घट झाली आहे .

 

आता पर्यंत गरुडझेप प्रतिष्ठाने २५१ , ३६५ , ५५० , ७०० , ९००, १००० , १२०० व आता १४०० दिवसांचे जागतिक विक्रम रचले आहे . भविष्यात आता २००० दिवसांचे लक्ष्य डॉ भानोसे ह्यांनी जाहीर केले आहे .

  • गरुडझेप प्रतिष्ठानचे रेणू भानोसे , संकेत भानोसे , पत्रकार अजिंक्य तरटे , संगीता भानोसे ,अविनाश क्षीरसागर ,अंजना प्रधान , सागर बोडके ,केतकी व संजीवनी नायगावकर ह्यांनी अभियानात सहभाग नोंदविला .
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे