बनावट देशी विदेशी दारू कारखाना राज्य उत्पादक विभागीय भरारी पथकातर्फे उद्ध्वस्त
दिनांक 26/02/2022 रोजी निरीक्षक ,राज्य उत्पादन शुल्क ,विभागीय भरारी पथक ,नाशिक विभाग, नाशिक या पथकाने *बनावट देशी विदेशी दारू निर्मिती कारखाना उध्वस्त केला.*
मा. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, श्री कांतीलाल उमाप साहेब, मा. संचालक राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, श्रीमती वर्मा मॅडम, मा. विभागीय उपायुक्त नाशिक विभाग श्री अर्जुन ओहोळ साहेब, मा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक, श्री मनोहर अंचूळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26-02-2022 रोजी चांदवड ते नाशिक रोडवर, चांदवड टोल नाक्याजवळ, मंगरूळ शिवार, ता.चांदवड, जि. नाशिक येथे वाहन तपासणी सापळा रचून संशयित महिंद्रा पिकअप क्र. एम.एच.41.ए. जी.0816 या वाहनातून वाहतूक करून नेत असताना बनावट देशी-विदेशी दारूचा साठा शिवम अनिल महाजन व राजेश वनाजी सोळसे याचा ताब्यात मिळून आला सदर बनावट दारूचा मद्यसाठा कोठून आणला याबाबत त्यांना विचारणा केली असता शुभम अनिल महाजन ,हा त्याच्या रहाते घरी हिरापूर, ता.चाळीसगाव, जि. जळगाव, येथे बनावट देशी-विदेशी दारू तयार करीत असल्याचे सांगितले त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर दोन्ही ठिकाणी *बनावट देशी विदेशी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, विविध ब्रॅण्डचे बुचे-4500 नग, देशी दारू टॅगो पंच चे 1000 लेबल्स,बाटली सील करण्याचे इलेक्ट्रॉनिक मशीन,मद्यार्क-340 ब. ली,बनावट देशी दारू-276.48 ब. ली व विदेशी दारू -95.04 ब. ली,असा वाहनासह रुपये- ८,४९,४२०/-* किमतीचा प्रॉव्हिबिशन गुन्ह्याचा मुद्देमाल मिळून आला आहे.
सदर कारवाई निरीक्षक ,राज्य उत्पादन शुल्क,विभागीय भरारी पथक,नाशिक विभाग, नाशिक, श्री ए. एस.चव्हाण, दुय्यम निरीक्षक श्री व्ही. एम.पाटील, ए. जी. सराफ, निरीक्षक भ. प.3 दिंडोरी श्री एम एन कावळे,जवान सर्वश्री गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, लोकेश गायकवाड,भाऊसाहेब घुले, युवराज रतवेकर, यांनी पार पडली.सदर कारवाई करिता निरीक्षक चाळीसगाव विभाग के डी पाटील साहेब व त्यांचा स्टाफ यांनी मदत केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक,विभागीय भरारी पथक,नाशिक विभाग,नाशिक श्री. ए. एस.चव्हाण हे करीत आहेत.