चांभार लेणी बोरगड येथे अडकलेल्या दोन मुलांची सुटका. आज सकाळची घटना. पंचवटी अग्निशमन विभाग.

नासिक जनमत प्रतिनिधी.
चांभार लेणीबोरगड येथे आज अडकलेल्या दोन युवकांची पंचवटी अग्निशामक दलाकडून सुखरूप सुटका. करण्यात यश आले आहे
आज सकाळची घटना
दोन मुलांना जीवनदान देण्यात यश आले पंचवटी अग्निशमन विभाग
सकाळी ९:१० मिंटानी साहिल जयसिंग टिळे यांचा फोन पंचवटी अग्निशमन केंद्र ला आला की मी व माझे मित्र ओम प्रकाश यादव चामर लेणी च्या माथ्या(TOP) जवळील तीव्र उतारा वर अडकलेलो आहोत तरी आपली मदत पाठवा वरील फोन प्रमाणे पंचवटी अग्निशमन केंद्र चा स्टाफ ( लीडिंग फायरमन संजय कानडे, फायरमन बाळासाहेब लहांगे , वाहन चालक प्रकाश मोहिते, ट्रेनी फायरमन प्रणय बनकर, ऋषिकेश जाधव, सिद्धांत गोतीस ) वरील घटना स्थळी बंब क्रमांक MH 15 HH 3309 सोबत पोहचले.
घटनास्थळी पोहचल्यावर बंबा
वरील स्टाफने रेस्क्यू चे साहित्य, दोर घेऊन चामर लेणीच्या पायरया व कच्च्या रस्त्याने डोंगरा ची चढाई केली, डोंगरावरील तीव्र उतारावर अडकलेली दोन मुले दिसली परंतु त्यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी खालून रस्ता नव्हता, दुसर्या रस्त्याने डोंगराच्या माथ्यावर जाऊन,मोठा दोर डोंगराच्या मोठ्या खडकाला बांधून अडकलेल्या मुलांकडे फेकला व प्रथम एकाला नंतर दुसर्याला दोराच्या सहायाने वर काढले (रेस्क्यू केले) व त्यांना खाली बसवून पाणी पाजून धीर दिला. नंतर त्यांना डोंगराच्या कच्च्या रस्त्याने खाली पोलिस चौकी पर्यंत आणले व पोलिस चौकी मध्ये त्यांच्या नावांची नोंद अंमलदार गणेश नागरे यांनी करुन घेतली त्यानंतर त्या मुलांना म्हसरूळ पोलिस स्टेशन चे पोलिस अंमलदार नितिन पारधे यांच्या ताब्यात दिले. सोबत मदतीला वैनतेय संस्थेचे श्री. परदेशी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे श्री. प्रथमेश लोहगावकर व सहकार्य महाराष्ट्र फायर डिपार्टमेंट चे संचालक चेतन शेजवळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने त्या दोन मुलांना जीवनदान देण्यात यश आले
[19/4, 3:22 PM] फायर ब्रिगेड. चेतन शेजवळ: चामर लेणी या डोंगरावरून दोन मुलांना काढून जीवनदान देण्यात यश आले पंचवटी अग्निशामक विभाग
लीडिंग फायरमन केंद्रप्रमुख संजय कानडे सर, फायरमन बाळासाहेब लहांगे सर वाहन चालक मोहिते सर व ट्रेनी फायरमन गोतीस, जाधव, बनकर तसेच सहकार्य महाराष्ट्र फायर डिपार्टमेंट संचालक चेतन शेजवळ, वैनतेय संस्थेचे श्री. परदेशी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रथमेश लोहगाव कर सर उपस्थित होते. पंचवटी अग्निशामक दलाला नाशिक जनमत परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन. सध्या उन्हाळा दिवस चालू असल्याने पर्यटकांनी सावध पर्यटन करावे. या दिवसांमध्ये मुरुमाळ खडक दगड अति उष्णतेमुळे झिज होऊन नरम पडतात. परिणामी दुर्घटना होण्याची शक्यता वाढतात. पर्यटकांनी काळजी घ्यावी. असे नाशिक जनमत तर्फे आव्हान करण्यात येत आहे.