सिटीलींक बसला ड्रायव्हर व कंडक्टर कर्मचारी घालतात तोट्यात.
नासिक रोड येथील घटना. टाईम झालेला असतानाही कंडक्टर ड्रायव्हर बाहेर

नाशिक जन्मत नाशिककरांच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिक महानगरपालिकेने सीएनजी बसेस इलेक्ट्रॉनिक बसेस तसेच डिझेलवरील बसेस खरेदी केल्या अत्यंत सोयीयुक्त अशा या बसेस आहेत व या बसेसचे भाडे देखील परवडण्यासारखे आहे. दरम्यान नासिक महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे या एसटी चालवणारे चालक व कंडक्टर हेच एसटीला तोट्यात आणत असल्याचे चित्र आहे.
परवा दिनांक 18 रोजी संध्याकाळी पाच वाजून 45 नाशिक रोड वरून निघणारी बस. निमानी स्टॅन्ड येणार होती. अशी पाटी देखील लावलेली होती. परंतु ड्रायव्हर कंडक्टर नसल्याने या गाडीची वेळ प्रवाशांना कळाली नाही च्या केबिनमध्ये कंडक्टर ड्रायव्हर नसल्याचे दिसले. याच वेळी सहा वाजता जाणारी बस बाजूला उभी होती या बस मध्ये 35 ते 40 प्रवासी बसलेले होते. यावेळेस अनेक प्रवासी बस मध्ये गर्दी असल्याचे पाहून शेजारी बस कडे बघत होते दरम्यान ती बस देखील निमानी स्टॅन्ड ला येणार होती
अखेर प्रवाशांनी ही बस भरली असल्याने खाजगी वाहने रिक्षाकडे आपला मोर्चा वळवला. याचवेळी पावणेसहा वाजता ड्रायव्हर आणि दोन एसटी कर्मचारी एसटीच्या ड्रायव्हर जवळ उभे राहिले आणि एकही प्रवासी न घेता एसटी बस निमानी स्टॅन्ड कडे रिकामी रवाना झाली. याच वेळेस बाजूची एसटी मधील ड्रायव्हर व कंडक्टर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ती निमानी लाज बस जाणार आहे. परंतु ड्रायव्हर कंडक्टर नसल्याने सर्व प्रवासी आमच्या बस मध्ये बसले. काही ड्रायव्हर कंडक्टर प्रामाणिकपणे सिटीलिंग बसमध्ये नोकरी करून पगार घेत असले तरी प्रामाणिकपणे नोकरी करत नसल्याचे चित्र आहे. या बसेस ला प्रवासी जरी भरपूर असले तरी एसटी कंडक्टर व ड्रायव्हर हे अनुभवी नसल्यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. तसेच महिन्याला पगार मिळत असल्याने महानगरपालिकेचे उत्पन्न वाढव अगर न वाढो याकडे सध्या युवा कर्मचारी यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. सहा वाजता जाणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पंधरा मिनिटे त्या एसटी कंडक्टर ड्रायव्हर नसल्याने टाईम न समजल्याने उशिरा जावे लागल्याने प्रवाशांनी संताप कंडक्टर ड्रायव्हर जवळ बोलून दाखवला. अचानक आलेले ड्रायव्हर काही करायचे आत रिकामी बस घेऊन नाशिक रोड नाशिक डेपोच्या बाहेर गेले. या उदाहरणावरून काही एसटी ड्रायव्हर कंडक्टर हे महानगरपालिका सिटी लिंक बसेस ला तोट्यात घालत असल्याचे चित्र आहे. नाशिक महानगरपालिकेने या कर्मचाऱ्यांकडे लक्ष देणे महत्त्वाचे झाले आहे. अनुभवी कर्मचारी नेमणे महत्त्वाचे झाले आहे. ज्याची खावी भाकरी त्याची करावी प्रामाणिकपणे चाकरी अशी म्हणण्याची वेळ आली आहे. पुढील वर्षी कुंभमेळा येत असून सिटी लिंक महामंडळाचे उत्पन्न वाढवायचे असेल तर अनुभवी स्टॉप नेमणे गरजेचे झाले आहे. या बसेस
अत्यंत सोयी व सेंसर युक्त आहे या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत मुंबईतील लोकल प्रमाणे पुढे येणारे स्टॉप धोनी प्रक्षेपणा द्वारे प्रभास यांना सांगण्यात येते. प्रवाशांची पसंती असली तरी कर्मचारी रिकाम्या बसेस घेऊन जाण्यात धन्यता मानत आहे.