नाशिक जन्मत मुंबईवरून चेन्नई कडे जाणाऱ्या गाड्या बऱ्याच आहेत परंतु दर सोमवारी सुपरफास्ट एक्सप्रेस सीएसटी वरून चेन्नईला जात असते. कल्याणला या गाडीचा टाईम दोन वाजता असतो. व या अगोदर एक वाजून 57 मिनिटांनी अजून एक मुंबईवरून चेन्नईला जाणार एक्सप्रेस गाडीअसते. कल्याणला सर्व प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने अनेक लोक मोबाईलवर द ट्रेन या ॲपवर ही गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर
येणार हे बघत असतात. सकाळपासूनच ही गाडी प्लॅटफॉर्म चारवर दाखवत होती. दरम्यान एक वाजून 57 मिनिटानी मुंबईला जाणारा चेन्नई एक्सप्रेस गाडी आली. तोपर्यंत ॲपवर दोन वाजेचा एक्सप्रेस याच प्लॅटफॉर्म येणार असे दाखवत होता. एक 57 ची चेन्नई एक्सप्रेस गेल्यानंतर सुपरफास्ट हप्त्यातून एकदा जाणारा एक्सप्रेस याच प्लॅटफॉर्मवर येईल याची वाट पाहत असताना अचानक अचानक प्लॅटफॉर्म बदलतो व गाडी सहा नंबरला येते चार नंबर वरचे प्रवासी सहा नंबर ला जात नाही तोपर्यंत गाडी निघून जाते. गेल्या दोन-चार महिन्यापासून केलेल्या रिझर्वेशन चे तिकिटाचे चे पैसे रेल्वे प्रवाशांचे वाया जात आहे. एक तर हा हप्त्यातून निघणारा सुपरफास्ट एक्सप्रेस याचा टाईम एक तासाने उशिरा करावा किंवा एक तास अगोदर करावा जेणेकरून नागरिकांनी पैसा वाया जाणार नाही व एकाच वेळेस तीन मिनिटांच्या अंतराने चेन्नई एक्सप्रेस दोन येत असल्याने प्रवाशांमध्ये संताप होत आहे एकाच वेळेस दोन्ही गाड्या आल्यामुळे धावपळ उडत असल्याने रेल्वे रूळ क्रॉसिंग करताना अपघात देखील होऊ शकतो. रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी. रिझर्वेशन तिकीट असल्यामुळे पैसे वापस मिळत नाही अनेक दिवसापासून केलेले नियोजन तिरुपती बालाजीला जाण्याचे रद्द होते. हे तिकीट पुन्हा दुसऱ्या गाडीला चालत नसल्याने. व ताबडतोब रिझर्वेशन मिळत नसल्याने तिरुपती बालाजी ला जाणारे प्रवासी भावी रेल्वेच्या या कारभारावर नाराज झालेले आहेत. याचा प्रत्यय चंद्रकांत धात्रक नाशिक जनमत यांना पत्नीसह आला आहे. रेणुगुंठा ल जाताना रेणुगुंठा ला जाताना चार वेळेस तिकीट काढावे लागले आहे. कल्याण वरून पुणे जनरल तिकीट. पुण्यावरून रेणुगुंठा जनरल तिकीट. पुणे रेल्वे सोलापूर वरून रेणुगुंठा तिकीट शिल्लक असल्याने ऑनलाईन रिझर्वेशन. असे चार वेळेस तिकिटाचे जवळपास तीन हजाराच्या वर पैसे दोघांना पेड करावे लागले. तसेच प्रवासात मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागले. रेल्वे प्रशासनाने या गाड्यांची वेळ बदलावी.रेल्वे प्रवाशांना सहकार्य करावे. अनेक ज्येष्ठ प्रवासीनागरिकांना देखील अनेकदा या गाडीला मुकावे लागलेले आहे. कल्याण ला एकाच वेळेस दोघी गाड्या येत असल्याने मोठी धावपळ उडते. मोठा अपघात होण्याच्या अगोदरच रेल्वे प्रशासनाने जागे होऊन या गाडीची टाईम टेबल बदलावा.अशी मागणी सर्व

( रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे तिरुपती बालाजी येथे जाणाऱ्या भाविकांचा व प्रवाशांचा आनंद गाडी निघून गेल्यामुळे निघून जातो. रेल्वे प्रशासनाने एक तासाच्या अंतराने या दोन्ही गाड्या चेन्नई साठी जाण्यासाठी ठेवाव्यात व प्रवाशांचा मन संताप कमी करावा.) या अगोदर पंधरा वेळेस कल्याण वरून रेणुगुंठाला अनेकदा चंद्रकांत धात्रक गेले कुटुंबासहित परंतु पहिल्यांदी तीन मिनिटांचे अंतराने दोन गाड्या आल्याने गाडी निघून गेली. असे अनेक प्रवाशि बाबत बाबत होते.)
प्रवाशांनी केलेली आहे. व रेल्वे प्रशासनाच्या चुकामुळे ज्यांचा प्रवास या गाडीतून झाला नाही त्यांना तिकिटाचे पैसे डबल वापस करावे अशी मागणी चंद्रकांत धात्रक व इतर प्रवाशांनी केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा