बस प्रवासात वृद्धेचे १७तोळ्यांचे दागिने लंपास
नाशिक जन्मत| सध्या सोन्याच्या किमती प्रति तोळा 90 हजाराच्या पुढे गेल्या आहेत त्यामुळे चोरांचे लक्ष सध्या सोने-चांदीवर जास्त आहे. काल मुंबई येथील एक महिला सप्तशृंगी गडावर गेल्या होत्या. सप्तशृंगगडावरून देवदर्शन घेऊन
परतलेल्या महिलेजवळील कापडी पिशवीत स्टिलच्या डब्ब्यात ठेवलेले १७ तोळ्यांचे सोन्याचे व २०० ग्रॅम चांदीचे दागिने असा सव्वाबारा लाख रुपयांचा ऐवज नाशिक ते बोरिवली बस प्रवासात अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांत शेवंती माहब्दी (रा. पन्नालाल चाळ, दहिसर पूर्व, मुंबई) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईनाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवंती माहब्दी या महिला ९ मार्चला वणीला गेल्या होत्या. दर्शनानंतर त्या बसने वणीहून नाशिक महामार्ग येथे आल्या. त्यानंतर महामार्ग ते बोरिवली अशा प्रवासात त्यांच्याजवळील पिशवीतील स्टीलच्या डब्यात ठेवलेले १७ तोल्याचे सोन्याचे व २०० ग्रॅम चांदीचे दागिने असा १२ लाख १९ हजाराचा ऐवज कापडी पिशवीसह चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी बस मध्ये देखील आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रवासी एसटी साठी मोठ्या प्रमाणात तिकिटाचे पैसे महामंडळाला देत असतात. प्रवाशाची सुरक्षा करणे एसटीचे काम असून बस स्थानकावर पोलीस बंदोबस्त ठेवणे गरजेचे झाले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा