येवल्यातील सावखेडा येथे सहावीतील दोघा विद्यार्थ्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

“सावखेडा येथे सहावीतील दोघा विद्यार्थ्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
प्रतिनिधी |नाशिक जन्मत
येवला गेल्या दोन दिवसापासून ऊन सावलीचा खेळ चालू असून सध्या क** ऊन पडत आहे. त्यामुळे शरीराची लाई होत आहे. दरम्यान गारवा मिळण्यासाठी काल येवला तालुक्यातील दोन मुले शेततळ्यामध्ये उतरली होती त्या दोघांचाही बुडून मृत्यू झालेला आहे या घटनेमुळे येवला तालुक्यातील सावखेडा या ठिकाणी शोक व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील सावखेडा येथे सोमवारी सकाळी शेततळ्यावर आंघोळीसाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
साई संदीप कुमावत (१२) व शुभम शांताराम गोरे (१२) अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही कुसूर येथील समता प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर महात्मा फुले विद्यालयात सहावीत शिकत होते. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शुभम गोरे शाळेला ईदनिमित्त सुटी असल्याने समाधान गोरे यांच्या शेततळ्यावर आंघोळीसाठी गेले होते. मात्र, पोहता येत नसल्याने दोन्ही मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला साई आणि शुभम दोघेही अतिशय जिवलग मित्र होते. अभ्यासात अतिशय हुशार होते. दोघांचेही आई-वडील बांधकाम मजुरी करतात. अचानक घडलेल्या या घटनेने सावखेडा गावावर शोककळा पसरली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उपजिल्हा रुग्णालयात मृत मुलांच्या नातेवाइकांची भेट घेत सांत्वन केले. तालुक्यात शेततळ्यांना संरक्षक जाळी बसविण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.