रेल्वे विभागात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून जनतेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारास अटक.
नाशिक जनमत नांदगाव येथील फिर्यादी चेतन शिवाजी ईघे राहणार नांदगाव व त्याचे इतर साथीदार यांचा विश्वास संपादन करून मध्य रेल्वे विभागात तिकीट तपासणी व गेटमन पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट सही व शिक्का असलेले बनावट नियुक्तीपत्र देऊन तसेच फिर्यादी व साक्षीदार यांच्या वैद्यकीय तपासणी करून बनावट सही व शिक्का असलेले मेडिकल सर्टिफिकेट देऊन फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडून एकूण 1 कोटी 15 लाख रुपये घेऊन तिकीट तपासणीस व गेटमन या पदावर नोकरीस लावून न देता फिर्यादी व साक्षीदार यांची फसवणूक केली म्हणून नाद गाव येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील फिर्यादी व साक्षीदार रेल्वे व इतर भरतीचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आरोपी नानेश्वर नथू सूर्यवंशी राहणार पवन नगर सोयगाव तालुका मालेगाव यांचे हनुमान नगर नांदगाव येथे असलेल्या सायबर कॅफेवर जात असे यावेळी यातील आरोपी आणि फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन केला तुम्ही ऑनलाईन फॉर्म कशाला भेरत आहे मी तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून टीसी पदासाठी 15 लाख रुपये व गेट में पदासाठी बारा लाख रुपये लागतील असे सांगून फिर्यादी व साथीदार यांची सतीश गुड्डू बुचे घ पुणे तालुका जिल्हा पुणे संतोष शंकराव पाटील राहणार कात्रज तालुका जिल्हा पुणे यांच्याशी ओळख करून दिल्यावर आरोपीने बनावट सही व शिक्का असलेल्या नियुक्तीपत्र व सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल भायखळा मुंबई बॉम्बे हॉस्पिटल मुंबई आली राणी मुखर्जी हॉस्पिटल रेल्वे दिल्ली या ठिकाणी मेडिकल झाले याबाबत असलेले मेडिकल सर्टिफिकेट देऊन यातील फिर्यादी व त्यांच्याकडून सुमारे एक कोटी 15 लाख रुपये घेऊन तिकीट तपासणी व या पदावर नोकरीस लावून न देता फिर्यादी व साक्षीदार यांची फसवणूक करण्याचा गुन्हा घडलेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर सूर्यवंशी राहणार गणपती मंदिर पवन नगर सोयगाव तालुका मालेगाव यास अटक करण्यात आलेली आहे नाशिक ग्रामीण पोलीस जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचना प्रमाणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर गाडे पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील भारत कांदळकर पोलीस निरीक्षक अनिल शेरकर सुनील कुराडे सागर कुमावत पोलीस कॉन्स्टेबल संदीप मुंडे यांचे पथकाने सदर कारवाई केली असून सदर गुन्हाच तपास चालू आहे.