ब्रेकिंग

धान्याने भरलेला पिकप खराब रस्त्यामुळे खड्ड्यात अडकला. गॅस पाईपलाईन मुळे होतोय अपघात.

नाशिक जनमत. *गेल्या 2 महिन्यापासुन सिडकोमधे एमएनजीएल (MNGL) गैस पाईप लाईन पाथर्डी फाटा, नम्रता पेट्रोल पंप ते विजयनगर पर्यंन्त चांगले डांबरीकरण रस्ते खोदुन गैस पाईप लाईन टाकली आहे व खोदलेला रस्ता निटनेटका जशाचा तसा माती व डांबर टाकुन बुजवलेला नाही व तो वरच्यावर माती ढकलुन बुजवलेला असल्यामुळे, रस्त्यावर माती पन मोठ्या प्रमाणात पसरली आहे त्यामुळे गाड्या स्लीप होणे, माँर्निग वाँक साठी सायकल पटु जात असतांना लहान मोठे अपघात होत आहेत, रस्त्यावर ये जा करणारे नागरीकांना खुपच त्रास सहन करावा लागत आहे, तसेच आज पिकअप गाडी धान्याने भरलेली होती ती रस्त्याच्या खड्ड्यात फसली आहे मोठा अपघात होत असतांना टळला व यातुन मोठे नुकसान होऊ शकत होते, जिवित हानी होऊ शकली असती. तरी याकडे मनपा प्रशासनाने व गैस कंपनीने गांभीर्याने घ्यायला पाहीजे.*

मनसेच्या वतीने वेळोवेळी निवेदने देऊन देखील कोणत्याही प्रकारची दखल मनपा प्रशासन व संबंधित गैस कंपनीचे व्यवस्थापक घेत नाहीत, तरी हे काम करत असतांना जनतेला वेठीस धरण्यात येत आहे असे आम्हाला निदर्शनास येत आहेत.
प्रशासन मोठा अपघात होण्याची वाट बघत आहे का.?

हे जर असे सुरु असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोठे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा मनसे शहर चिटणीस संदिप दोंदे व शहर संघटक अर्जुन वेताळ यांनी दिला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे