ब्रेकिंग
राष्ट्रसंत भगवान बाबा यांची पुण्यतिथी सिडकोत साजरी.

- नाशिक जनमत सामाजिक सलोखा व एकात्मता निर्माण करणारे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज सिडको येथे पुण्य तिथी साजरी करण्यात आली न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुनाताई घुगे यांच्या उपस्थित. भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त पुष्प अर्पण करून मनोगत व्यक्त केले.भगवान बाबा यांच्या जिवन कार्याविषयी बाळासाहेब घुगे म्हणाले राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी समाजासाठी समाजप्रबोधनाचे कार्य केले आपला डोंगर दर्यात राहणारा समाज हा असू
- शिक्षित आहे जुन्या चाली रुढीत गुंतलेला आहे जुन्या परंपरेत अडकलेला आहे हे ओळखून त्यांनी समाजासाठी समाज प्रबोधन करण्याचे ठरविले आणि सर्वात पहिले समाज सुशिक्षित करण्यास सर्वात मोठा योगदान भगवान बाबांच आहे. “जमीन विका पण मुलांना शिकवा”” हे त्यांचे ब्रीद वाक्य होतं. त्याचप्रमाणे सर्व समाजाला अध्यात्मिक ज्ञान दिले. समाज एकत्रित केला आणि एकत्रित बळ काय असतं हे साक्षात त्यांनी समाजाला करून दाखवलं आणि म्हणूनच बाबांच्या समाधी स्थान भगवान बाबा गड येथे आज लाखो संख्येने सर्व समाज पुण्यतिथी असो जयंती असो बाबांच्या स्मरणार एकत्र येतो आणि प्रेमाने सलोख्याने बंधुभावाने संपूर्ण भारतभर हा समाज आनंदाने गुढी गुलाबाने नांदतो ही बाबांचीच देन आहे. अस उद्गार पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री बाळासाहेब घुगे यांनी यांनी माहिती दिली . त्याचप्रमाणे गोविंद भाऊ घुगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी लोकनेता प्रतिसादांचे अध्यक्ष गोविंद घुगे भारतीय जनता पार्टी चे ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस प्रकाशजी चकोर क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ दरगुडे ओबीसी मोर्चाचे मंडल अध्यक्ष विलास सानप सर उत्तम पिंटू काळे क्रांती सेना नाशिक शहराध्यक्ष भगवान घुगे सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घुगे यांनी केले होते.