गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नारायण बाबा जाधव प्रहार सैनिक कल्याण संघाच्या इगतपुरी रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित
गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नारायण बाबा जाधव प्रहार सैनिक कल्याण संघाच्या इगतपुरी रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित
इगतपुरी ( प्रतिनिधी ) तालुक्यात कोणत्याही गावात कोणत्याही प्रकारचे भांडण तंटा वा इतर समस्या असो त्या गावातच सोडवण्याचे प्रयत्न करणारे सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष नारायण बाबा जाधव यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. घोटीवाडी येथील शेतकरी कुटुंबातील तसेच वारकरी सांप्रदायिक असलेले बाबा लहान थोरांना बरोबर घेऊन चालणारे आहेत. अनेक सामाजिक कामांनी नारायण बाबांनी तालुक्यात नाव उंचावल्याचे दिसते आहे. त्यांच्या कामाची प्रहार सैनिक कल्याण संघाने दखल घेऊन त्यांचा इगतपुरी रत्न गौरव पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला. लहान पणापासूनच साक्षात पांडुरंगाची हृदयात श्रद्धा ठेवून वारकरी सांप्रदायाची पताका मजबूत करण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. सकाळपासूनच घरात देवपूजा करून ते आपल्या कामाला जोमाने सुरुवात करतात. कोर्ट कचेरी कामांमध्ये सर्वसामान्य व्यक्तींचा वेळ खर्च होतो. आर्थिक खर्चही याला आळा घालण्यासाठी घरगुती वाद, जमिनीचे वाद आपापसात कसे मिटतील यावर त्यांचा नेहमी भर असतो. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा काय असतात याची जाणीव ठेवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम बाबांनी केले आहे. तालुक्यात भाताला हमीभाव मिळण्यासाठी देखील नारायण बाबा मोठे प्रयत्न केले आहेत. मराठा समाजामध्ये अनाठायी खर्चाना फाटा देऊन फेटे, टॉवेल, टोपी बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसते.
कोरोना काळात स्वतः ची जीवाची पर्वा न करता एक संघ मराठा बांधव सेवाभावी संस्था इगतपुरी यांच्या माध्यमातून
कोरोनाने निधन झालेल्या कुटुंबाचे सांत्वन करून त्यांना आधार देण्याचे काम त्यांनी केले आहे. ह्या कुटुंबाना अन्नदान करण्यात देखील त्यांचे मोठे योगदान आहे. या काळात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आदी वस्तू त्यांनी पोहचवण्याचे कार्य केले आहे. दवाखान्याची कामे आरोग्यदूत म्हणून केली आहेत. वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष असलेले नारायण बाबा जाधव हे आळंदीची वारी न चुकता नेहमी करीत असतात. सकल मराठा समाज अध्यक्ष, छावा क्रांतिवीर शेतकरी आघाडी संघटना अध्यक्ष , वारकरी साहित्य परिषद अध्यक्ष अशी पदे असतानाही कोणत्याही प्रकारचा गर्व नसलेले शेतकरी आणि दुग्धव्यवसाय करणारे नारायण बाबा मनमिळावू स्वभावामुळे ते आता लहान थोरांचे बाबा झाले आहेत. अशा विविध प्रकारच्या सामाजिक कामांमध्ये पुढाकार घेणाऱ्या नारायण बाबांना प्रहार सैनिक कल्याण संघाचा इगतपुरी रत्न गौरव पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.