ब्रेकिंग
*नाशिक जिल्ह्यासाठी 2023 या वर्षाकरिता तीन स्थानिक सुट्टया जाहीर*
*नाशिक जिल्ह्यासाठी 2023 या वर्षाकरिता तीन स्थानिक सुट्टया जाहीर*
*नाशिक, दि. 6 जानेवारी,2023 (विमाका वृत्तसेवा):*
सन 2023 या वर्षाकरिता नाशिक जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्टया विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुढीलप्रमाणे जाहीर केल्या आहेत. 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन, 14 सप्टेंबर, रोजी पोळा आणि 10 नोव्हेंबर,2023 रोजी धनत्रयोदशी.
सदर स्थानिक सुट्टया न्यायालयीन विभाग वगळून सर्व शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्थाना लागू असतील, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे.