तीस लाखाचा अपहार. एसटी कर्मचाऱ्याविरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार.
भद्रकाली पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांनी दिली तक्रार
प्रतिनिधी |नाशिक जनमत
एस.टी. महामंडळाच्या नाशिक डेपो १ मध्ये करो नाच्या काळात घडलेला प्रकार आता उघड झाल्याने भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मालवाहतुकीनंतर प्राप्त होणाऱ्या रकमेपैकी ३० लाखांचा अपहार एस.टी. कर्मचारी अशोक मोरे यांनी केल्याप्रकरणी व्यवस्थापक दादाजी महाजन यांनी संबंधिताविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कोरोनाकाळात प्रवासी वाहतूक घटल्याने उत्पन्न वाढविण्यासाठी एस.टी. महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरू केली. त्यामुळे उत्पन्नात चांगलीच वाढ झाली. मात्र नंतर प्रवासी वाहतुकीसाठी बसेस वापरल्या जात असल्याने महामंडळाने १ एप्रिल २०२५ पार्सल
(३० लाखांहून अधिक रुपयांचा घोटाळा या कर्मचाऱ्याने केला असून काही कर्मचाऱ्यांचा कामातील निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला. त्याचा चौकशी करण्यासाठी एस.टी.च्या मध्यवर्ती कार्यालयाने समिती स्थापन केली आहे.)
सेवा बंद केली. मात्र मालवाहतुकीची थकबाकी वसूल करण्याचा सूचना दिल्या. यात नाशिक डेपोमध्ये कार्यरत अशोक मोरेने ३० लाख ६७हजार रुपये एस.टी.कडे भरलेच नसल्याचे लक्षात आले. तो कामावर गैरहजर असल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या प्रकारामुळे एसटी कर्मचाऱ्यां खळबळ उडाली आहे.