महात्मानगर येथील प्रकार; गुन्हा दाखल
नाशिक जनमत नाशिक शहरामध्ये चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत आहे पोलिसांची गस्त अपुरे असल्याने या घटना घडत आहे काल महात्मा नगर येथे हॉस्पिटलच्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाडी च्या डिकीतून चार लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे
हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभ्या दुचाकीच्या डिकीतून ४ लाखांची रक्कम चोरी केल्याचा प्रकार महात्मानगर येथील एका हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उघडकीस आला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अशाला आहे. अशोक पार्क (रा. जुने सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी (दि. १२) दुपारी १.२० ते २ या कालावधीत महात्मा नगरातील एका हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यास अडले होते. एमएच १५ डीम ५५९५ क्रमांकाची दुचाकी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभी करुन ते हॉस्पिटलमध्ये गेले. या कालावधीवच त्यांच्या दुचाकीची डेकी उघडून डिकीत ठेवलेली ४
लाखांची रक्कम चोरी करण्यात आली. पार्क यांनी याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली असता त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला गेला. त्यानुसार पार्क यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पार्किंगमधून चोरी केल्याचा प्रकार घडल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दुचाकी डिकी उघडण्यास एक्स्पर्ट असलेल्या चोराने डिकी उघडून चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरातील सीसीटीव्हीच तपासणी सुरु असून संशयिताला लवकरच पकडले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधन होत आहे
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा