नाशिक शहरातून होळीच्या दिवशी तीन मुली बेपत्ता. पालकांमध्ये घबराट.
नाशिक जन्मत प्रतिनिधी. गेल्या काही दिवसापासून शहरातील मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलेले आहे होळीच्या दिवशी तीन मुली बेपत्ता झाल्याचे वृत्त असून गुन्हे नोंद झालेले आहे अंबड उपनगर सरकार वाडा या पोलिस ठाण्यामध्ये हे गुन्हे नोंदवले आहे.
शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन अल्पवयीन मुलींसह एक मुलगा बेपत्ता झाला. होळीच्या दिवशी मुली बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सरकारवाडा, अंबड आणि उपनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉलेजरोड येथे राहणारा अल्पवयीन मुलगा सकाळी साडेआठला खासगी क्लासला जातो असे सांगून परत आलेला नाही. त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. खुटवडनगर, परिसरात राहणारी १५ वर्षीय मुलगी सायंकाळी साडेसहाला बाहेर जाते असे सांगून
गेली ती परत आली नाही. पालकांनी शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. संजीवनगर (अंबड) परिसरातील १३ वर्षीय मुलगी सकाळी साडेनऊला किराणा दुकानात कुरकुरे घेण्यास गेली असता परत आली नाही. नाशिकरोड येथील ११ वीतील मुलगी कॉलेजला जाते असे सांगून गेली. काही वेळाने आईने फोनवर विचारले असता प्रेक्टिकल संपल्यानंतर घरी येते, असे बोलून फोन बंद केला. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी आली नाही. आईने कॉलेज तसेच घर परिसर तसेच मैत्रिणीकडे शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. सरकारवाडा, प्र अंबड आणि उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवलेला आहे.