उपनगर परिसरातील आंबेडकर वाडी मध्ये दोन सख्या भावाचा खून.

नाशिक जनमत:- नाशिक शहरातील बोधले नगर परिसरातील या आंबेडकर वाड़ी येथे दोन सख्या भावांचा अज्ञात टोळीने धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली.
गेल्या काही महिन्यापासून नाशिक शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. खूणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे काल एकीकडे रंगपंचमी साजरी होत असताना नाशिक मधील बोधले नगर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पदाधिकारी उमेश उर्फ़ मन्ना जाधव व त्याचा भाऊ प्रशांत जाधव याचावर हल्ला झाला व त्यात ते मृत झाल्याची घटना घडली आहे. हल्लेखोर खून करुन पसार झाले असून उपनगर पोलीस पुढील तपास करत आहे.
हत्ये मागील कारण अजुन स्पष्ट झाले नसून परिसरातील नागरिकांची पोलिस चौकशी करत आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृतांना शाशकीय रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला असून दंगल नियंत्रण पथक देखील दाखल झाले आहे. उपनगर पोलिसांची चार पथके हलखोरांच्या शोधासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त मोनिका राउत यांनी दिली.