महिलेचा विनयभंग. आडगाव पोलीस गुन्हा दाखल.
नाशिक जनमत पोलिसांकडून कठोर कारवाई होत नसल्याने विनयभंगाच्या तक्रारीत वाढ झाली आहे. कल अशीच एक घटना घरात एकट्या असलेल्या महिलेच्या घरात जात एका इसमाने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार आडगाव पोलिस ठाण्याच्या जवळ असलेल्या इमारतीमध्ये उघडकीस आला. आडगाव पोलिस ठाण्यात संशयिताच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता अमृतधाम येथे वास्तव्यास आहे. मूळ पैठण, छत्रपती संभाजीनगर येथील असून त्या नाशिक येथील घरी आल्या होत्या. दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरी एकट्या होत्या. आंघोळ करण्यास गेल्या असताना शेजारी राहणारा संशयित नंदलाल गिदिया (रा. जुना गंगापूरनाका) घरात आला. घरात कोणी नव्हते. महिला आंघोळ करून बाहेर आल्यानंतर संशयित समोर उभा दिसला.
संशयिताने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. घडलेल्या प्रकाराने भेदरल्याने महिलेने खोलीत स्वतःला बंद करून घेतले. संशयित दरवाजा ठोठवत असताना आरडाओरड केल्यानं संशयिताने घरातून पळ काढला. पोलिस ठाण्यात संशयिताच्या विरोधात गुन्हा करण्यात आला आहे.