ब्रेकिंग
अंघोळ घालताना बादलीत पडल्याने चिमुरड्याचा मृत्यू भंडाऱ्याच्या पालगाव येथील दुर्दैवी घटना.
अंघोळ घालताना बादलीत पडल्याने चिमुरड्याचा मृत्यू भंडाऱ्याच्या पालगाव येथील दुर्दैवी घटना
भंडारा नाशिक जन्मत पाण्याने भरलेल्या बादली मध्ये पडल्याने दीड वर्षाचे बाळ ठार झाल्याची घटना घडली आहे.
पालगाव येथे अंघोळ घालताना बादलीत पडल्यामुळे दीड वर्षीय बाळाचा मृत्यू झाला. या बाळाचे नाव अथर्व राहुल बावणकर (दीड वर्ष) असे होते. पालगाव येथे शनिवारी दुपारी आजी बाळाला अंघोळ घालत असता तो पाणी असलेल्या प्लास्टिकच्या बादलीत पडून बुडाला. आजीने बाहेर काढेपर्यंत तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला उपचाराकरिता तातडीने सामान्य रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासून बाळाला मृत घोषित केले. बावनकर कुटुंब व गावात शोक काळा पसरले आहे.