
गोविंद नगर येथे कारच्या धडकेने शिक्षिका ठार, दोन गंभीर
गोविंदनगर बोगदा- आरडी सर्कल रोडवर मद्यपी कारचालकाने उडवले ३ गाडे
प्रतिनिधी नाशिकजन्मत
काल नाशिकच्या गोविंद नगर भागामध्ये एका नी कारचालकाने निषकाळजीपणाने वाहन चालवल्याने एका शिक्षिकेचा जागी मृत्यू झालेला आहे तर दोन गंभीर जखमी झालेले आहेत.
भरधाव वेगात जाणाऱ्या आलिशान कारने शीतपेय घेण्यासाठी आलेल्या गायत्री ठाकूर शिक्षिकेसह दोन काय चालकाने धडक दिल्याने दोन जण जण गंभीर जखमी झाले. यात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी दुपारी ४ वाजता गोविंदनगर बोगदा ते आरडी सर्कल रोडवर हा भीषण
अपघात घडला. यात गायत्री संदीप ठाकूर (३८, रा. इंदिरानगर) या ठार झाल्या. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात संशयित कारचालकाच्या विरोधात ड्रंक अँड ड्रायव्हिंग अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुपारी ४ वाजता गायत्री ठाकूर आणि त्यांच्या मैत्रिणी विवाह
सोळा करून आपल्या घरी येत होत्या. आपल्या घरी त्यांनी सांगितले होते की मी
१० मिनिटांत येते. असे म्हणाल्या, मात्र त्या आल्याच नाही… गायत्री ठाकूर या शिक्षिका असून इंदिरानगरला जात असताना ऊन जास्त असल्याने मैत्रिणींसोबत त्या शीतपेय घेण्याकरिता थांबल्या होत्या. घरी फोन करत १० मिनिटांत येते, असे त्यांनी सांगितले होते. मात्र काही वेळाने कुटुंबियांना त्यांच्या अपघाताची माहिती कळल्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये आक्रोश करण्यात आला. भडगाव वेगात आलेल्या कारणे दोन हातगाड्यांनाही धडक दिली. जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी दवाखान्यात गेले असता गायत्री ठाकूर या मृत्युमुखी पडल्या. चोरमले नामक व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी इंदिरानगर पोलिसांनी धाव घेत कारचालक सोरप भोपे ताब्यात घेतले. आमलेट विक्री करणाऱ्या व फुल विक्री करणाऱ्या दोन्ही हात गाड्यांना कारणी जोरदार धडक दिली. यावेळेस कारचा पत्रा गायत्री ठाकूर यांच्या पोटात शिरला. मोठा रक्तस्त्राव यावेळी झाला. या घटनेने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते. गायत्री ठाकूर या पेठे विद्यालयात शिक्षिका होत्या त्यांना दोन लहान मुले आहेत.. या घटनेमुळे नाशिक शहरात पुन्हा एकदा ड्रम ड्राईव्हचा अनुभव पाहण्यास मिळाला. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हर वर क** कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केलेली आहे.