नासिक जनमत काल रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान दिल्ली रेल्वे स्टेशनवर प्रयागराज येथे जाणाऱ्या भाविकांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगरा चिंगरा झाली . या घटनेमध्ये दहा महिला तीन बालक मृत्युमुखी पडले आहेत. जवळपास 25 जन जखमी आहेत. दिल्ली येथील दवाखान्यात 15 जण ठार झाल्याचे सांगण्यात आलेले आहे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
प्रयागराज येथे जाण्यासाठी स्पेशल रेल्वे गाडी लेट झाली होती. दरम्यान प्रयागराज येथे जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. स्पेशल रेल्वे गाडी प्लॅटफॉर्म वर येताच. रेल्वे स्टेशनवर मोठी धावपळ उडाली. यामध्ये अनेक जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जखमींना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी अबुल्यास मोठ्या प्रमाणात टेन्शन वर आल्या होत्या. मागील पंधरा दिवसांपूर्वी प्रयागराज येथील घटना ताजी असताना पुन्हा दिल्ली रेल्वे स्टेशनवर घटना घडल्याने सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीट करून या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलेले आहे. तसेच राष्ट्रपती यांनी देखील दुःख व्यक्त केलेले आहे.
प्रयागराज येथे जाण्यासाठी स्पेशल रेल्वे तसेच भुवनेश्वर एक्सप्रेस या दोन गाड्या भाविकांना घेऊन जाण्यासाठी टेशनवर आले असल्याचे सांगण्यात येत आहे.. त्याच वेळेस ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली काहीजणांनी या गर्दीमध्ये लोटालोटी केली आणि दुर्घटना घडली असे प्रत्येक दर्शनी सांगत आहे.

घटनास्थळावर मदत कार्य मोठ्या प्रमाणात केले जात आहे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
प्रयागराज कडे जाणाऱ्या भाविकांची गर्दी 90 टक्के होती. मोठ्या प्रमाणात 14 नंबर प्लॅटफॉर्मवर भाविकांची गर्दी उसळली होती.. भुवनेश्वर एक्सप्रेस व स्वातंत्र्य सेनानी एक्सप्रेस या गाड्या लेट असल्याने भाविकांची संध्याकाळी सात वाजेपासून गर्दी वाढली होत
भाविकांची संध्याकाळी सात वाजेपासून गर्दी वाढली होती. दरम्यान स्वातंत्र्यसेनानी एक्सप्रेस सोळा नंबर प्लॅटफॉर्मवर येत असल्याची घोषणा झाली. आणि 14 नंबर प्लॅटफॉर्मवरून भावीक प्रवासी 14 वरून 16 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर पळू लागले. यामुळे मोठी रेल्वे दुर्घटना घडली. रेल्वेतर्फे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना कोणताही मदत कक्ष उभारला नसल्याची कारणे भाविकांतर्फे सांगण्यात येत आहे…
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा