महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी सामना पहिल्या दिवशी महाराष्ट्र ७ बाद २५८
यष्टीरक्षक सौरभ नवले नाबाद ६०, अतित सेठ ३ बळी
महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी सामना पहिल्या दिवशी
महाराष्ट्र ७ बाद २५८
यष्टीरक्षक सौरभ नवले नाबाद ६०, अतित सेठ ३ बळी
मान्यवरांच्या हस्ते सामन्याचे शानदार उद्घाटन
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे सुरु झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध बडोदा रणजी ट्रॉफीत , हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्राच्या ७ बाद २५८ धावा झाल्या आहेत. यष्टीरक्षक सौरभ नवले ६० धावांवर नाबाद आहे. तर बडोदाच्या अतित सेठने ३ बळी घेतले.
२३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यानच्या चार दिवसीय सामन्यातील हा पहिला दिवस. प्रथम फलंदाजी मिळालेल्या महाराष्ट्राची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. १२ व्या षटकातच सलामीची जोडी तंबूत परतली. १ बाद ३९ व २ बाद ४१ पवन शाह १२ व मुर्तुझा ट्रंकवाला २२ . त्यानंतर १९ व्या षटकातच कर्णधार ऋतुराज गायकवाडला १० धावांवर बाद करून बडोदाने महाराष्ट्र संघाला मोठा धक्का दिला. त्यानंतर मात्र सिद्धेश वीर व यश क्षीरसागर यांनी ६८ धावांची भागीदारी करत डाव सावरला. सिद्धेश वीर ४८ धावांवर तर पाठोपाठ यश क्षीरसागर ३० वर बाद झाला. त्यानंतर ६ बाद १४५ पासून यष्टीरक्षक सौरभ नवले व रामकृष्ण घोष यांची देखील ६८ धावांचीच भागीदारी झाल्यावर डावातील पहिला षटकार मारून रामकृष्ण कर्णधार कृणाल पंड्याला दुसरा उंच फटका मारण्याच्या नादात २६ धावांवर बाद झाला- ७ बाद २१३ . ७ व्या क्रमांकावरील यष्टीरक्षक सौरभ नवलेच्या दमदार अर्धशतकामुळे – ८ चौकारांसह नाबाद ६० – महाराष्ट्र संघाच्या पहिल्या दिवसअखेर ७ बाद २५८ धावा झाल्या आहेत. सौरभ नवलेला रजनीश गुरबानी नाबाद २२ धावांवर साथ देत आहे. बडोदाच्या अतित सेठने ३, राज लिम्बाणीने २ तर कृणाल पंड्या व महेश पिठीयाने प्रत्येकी १ बळी घेतला. अंतिम संघात नाशिकचे मुर्तुझा ट्रंकवाला व रामकृष्ण घोष यांचा समावेश झाला आहे.
त्याआधी सकाळी छोट्याशा शानदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते आकाशात विविध रंगी फुगे सोडून सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार, सेक्रेटरी कमलेश पिसाळ,सी इ ओ अजिंक्य जोशी, पदाधिकारी अतुल जैन , विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम , जिल्हाधिकारी जलज शर्मा , खासदार राजभाऊ वाजे , आमदार देवयानी फरांदे , सीमाताई हिरे व राहुल ढिकले आदी मान्यवर उपस्थित होते . आमदार देवयानी फरांदे यांनी महाराष्ट्र संघाला मराठीतून तर बडोदा संघाला टाळ्यांच्या गजरात खास गुजराथीतून शुभेच्छा दिल्या. यावेळी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी चेअरमन विलास भाऊ लोणारी , विद्यमान चेअरमन धनपाल ( विनोद ) शहा, सहसचिव योगेश मुन्ना हिरे व चंद्रशेखर दंदणे, सेक्रेटरी समीर रकटे , खजिनदार हेमंत देशपांडे, संघटनेचे पदाधिकारी राघवेंद्र जोशी, निखिल टिपरी , शिवाजी उगले, बाळासाहेब मंडलिक , महेश मालवी, हेतल पटेल असे आजी व माजी कार्यकारिणी सदस्य तसेच तीनहि निवड समिति सदस्य सतीश गायकवाड, तरुण गुप्ता व फय्याज गंजीफ्रॉकवाला उपस्थित होते.