बीसीसीआयची १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय ट्रॉफी कर्नाटक वरील विजयात शाल्मली क्षत्रियच्या नाबाद ७८
बीसीसीआयची १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय ट्रॉफी
कर्नाटक वरील विजयात शाल्मली क्षत्रियच्या नाबाद ७८
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या शाल्मली क्षत्रियने नाबाद ७८ धावा करत बीसीसीआयच्या राष्ट्रीय पातळीवरील १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्राला कर्नाटकवर विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला.
सुरत येथे झालेल्या सामन्यात कर्नाटकने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ८ बाद २१७ धावा केल्या. विजयासाठी २१८ लक्ष्याचा पाठलाग करतांना ३ बाद ८८ वरुन शाल्मली क्षत्रियने ६ चौकार व २ षटकारांसह ९० चेंडूत नाबाद ७८ धावांचे अतिशय महत्वपूर्ण योगदान देत महाराष्ट्राला कर्नाटक वर ४ गडी राखून विजय मिळवून दिला.
सदर स्पर्धेतील महाराष्ट्र संघाचे साखळी सामने सुरत येथे ४ ते १२ जानेवारी दरम्यान नियोजित असून बाकी सामने पुढीलप्रमाणे :
६ जानेवारी – चंडीगड , ८ जानेवारी – विदर्भ , १० जानेवारी – आसाम , १२ जानेवारी – मिझोराम .
शाल्मली क्षत्रियच्या या विजयी कामगिरीनबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी शाल्मलीचे अभिनंदन करून पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
शाल्मली क्षत्रिय