अयोध्या सायकल वीरांचे नाशिकरोड स्टेशनवर जोरदार स्वागत* खा राजाभाऊ वाजे यांची उपस्थिती
*अयोध्या सायकल वीरांचे नाशिकरोड स्टेशनवर जोरदार स्वागत*
खा राजाभाऊ वाजे यांची उपस्थिती
नाशिक जन्मत रॉयल रायडर्स च्या वतीने आयोजित नाशिक ते अयोध्या सायकल साहस मोहीम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या सायकलवीरांचे 24 तारखेला रात्री साडेसात च्या सुमारास तुलसी एक्स्प्रेस ने नाशिकरोड स्टेशनवर आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांची उधळण करत उपस्थितांनी सर्वांचे स्वागत केले.
या विजयीवीरांचे स्वागत करण्यासाठी नाशिक चे लोकप्रिय खासदार श्री राजाभाऊ वाजे, पंचवटी पोलिस स्टेशन चे वपोनि श्री मधुकर कड साहेब, नवरसेवक दिनकर आढाव आवर्जून उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक सहभागी रायडरचे औक्षण व पुष्पहार घालून स्वागत केले जात होते. 12 दिवसात 1460 किमी सायकलिंग केल्या नंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा थकवा रायडर्सच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.
या मोहीमेत 76 पुरुष व 12 महिलांसह एकूण 88 जणांनी सहभाग घेतला होता. 6 क्रु मेम्बर सहभागी होते. सर्व आव्हाने लीलया पार करत नाशिक ते अयोध्या अर्थात कर्मभूमी ते जन्मभूमी ही 1460 किमी ची सायकल साहस मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.
या साहसवीरांचे स्वागत करण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येने नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार उपस्थित होते.