अशोकनगरला अतिक्रमण कारवाई. २ ट्रक साहित्य जप्त. . विक्रेत्यांमध्ये घबराट
अशोकनगरला अतिक्रमण निर्मूलन, २ ट्रक साहित्य जप्त
संग्रहित दृश्य
अशोकनगर ते सात माउली चौक रस्ता येथील अतिक्रमण पालिकेने हटवले.
प्रतिनिधी | सातपूर नाशिक जन्मत
महापालिकेच्या सातपूर विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने अशोकनगर ते सात माऊली चौक रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांवर सोमवारी (दि. ६) कारवाई करत दोन ट्रक साहित्य जप्त केले. यामुळे हा रस्ता अतिक्रमणमुक्त झाला.
अशोकनगर ते सात माऊली चौक • रस्त्यावर चिकन विक्रेते, चायनीज गाड्या, फळविक्रेत्यांमुळे हा रस्ता
अरुंद होत वाहतूक कोंडी निर्माण होत होती. अशोकनगर ते कार्बननाका, गंगापूररोड व सातपूर एमआयडीसीला जाणारा हा महत्त्वाचा रोड असल्याने या अतिक्रमणामुळे रोज या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. सायंकाळच्या वेळेला रहिवाशांना पायी चालणे या ठिकाणी कठीण होत होते याबाबत नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रारी केलेल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेत या कारवाया करण्यात आल्या.
याबाबत वारंवार तक्रार आल्याने अतिक्रमण हटवून दोन ट्रक हित्य जप्त करण्यात आले.