ननाशी येथे नववर्ष च्या सुरुवातीलाच दोन जनानी केला एकाचा खून. शरीरापासून मुटके बाजूला करत मुंडके घेऊन आरोपी पोलीस ठाण्यात हजर.
नाशिक जन्मत पेठ तालुक्यातील नानाशी येथे अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली असून. मागील भांडणाची कुरापत काढून. एकाचे शीर धडा वेगळे केलेले आहे. आणि उशीर घेऊन पोलीस ठाण्यात आरोपी दाखल झाले. या घटनेने काही काळ पोलीस देखील समोरचे दृश्य पाहून चक्रावले होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की
पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ननाशी औट पोस्ट ता. दिंडोरी येथे गावच्या भरवस्तीत सकाळी १० वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून एकाची धारदार कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी मयताचे शीर घेऊन कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात पोहोचला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ननाशी औट पोस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रा नजीक ननाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे, सुरेश बोके व विशाल बोके यांच्यात काही कारणावरून गेल्या दोन वर्षापासून वाद सुरु होता. या वादाच्या कारणावरून वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती. मात्र, आज नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे, सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यांत वाद उफाळून येऊन त्याचे रुपांतर हाणामारीत झाली. यात सुरेश बोके,विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचे मुंडके कुऱ्हाडीने धडावेगळे केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर बोके बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीने मयत वाघमारेचे मुंडके व हत्यार घेऊन ननाशी पोलीस ठाण्यात दाखल होत झालेल्या घटनेचा पोलीस तपास करत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागामध्ये देखील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पोलिसांच्या वचक कमी झाल्याचे हे चित्र सर्वत्र दिसत आहे.