बीसीसीआयच्या विजय मर्चंट स्पर्धेत नील चंद्रात्रेचे वडोदरा विरुद्ध सामन्यात १० बळी
बीसीसीआयच्या विजय मर्चंट स्पर्धेत
नील चंद्रात्रेचे वडोदरा विरुद्ध सामन्यात १० बळी
दोन सामन्यात २५ बळी
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नील चंद्रात्रेने बी सी सी आय च्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातर्फे वडोदरा विरुद्ध दोन्ही डावात प्रत्येकी ५ बळी घेत सामन्यात एकूण १० बळी घेण्याची जोरदार कामगिरी केली . याधीच्या गोवाविरुद्धच्या सामन्यातदेखील नीलने आपल्या भेदक डावखुरया फिरकी गोलंदाजीने १५ बळी घेत अफलातून कामगिरी केली होती .
सुरत येथे झालेल्या विजय मर्चंट ट्रॉफी स्पर्धेत वडोदरा विरुद्ध तीन दिवसीय कसोटीत पहिल्या डावात नीलने २१ धावांत ५ बळी तर दुसऱ्या डावात केवळ ११ धावांत ५ बळी टिपले. गोलंदाजीत नील ची हि कामगिरी व फलंदाजीत प्रज्वल मोरे नाबाद २४२ धावा आणि गुंजन सावंत १६३ धावा यांच्या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने शेवटच्या साखळी सामन्यात वडोदरा संघावर एक डाव व ३३१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
या लागोपाठ दोन सामन्यांतील अफलातून कामगिरी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व सेक्रेटरी समीर रकटे यांनी नील चंद्रात्रेचे खास कौतुक करून उर्वरित स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.