ब्रेकिंग

नाशिक मध्ये क्रेडितर्फे घेण्यात आलेल्या प्रदर्शनास मोठा प्रतिसाद. भव्य उद्घाटन.

नाशिक जन्मत  काल नाशिकच्या ठक्कर  डोम येथे क्रीडेई च्या घर प्रदर्शनाशाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी मंचावर क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील, शेल्टर २०२४ चे समन्वयक गौरव ठक्कर,

 

 

 

शेल्टर २०२४ चे मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनिल कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष सुरेश अण्णा पाटील, अविनाश शिरोडे, उमेश वानखेडे व रवी महाजन हे मान्यवर देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहसचिव अनिल आहेर यांनी स्वागत केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील म्हणाले की, नाशिकचे ब्रॅण्डिंग सर्वदूर व्हावे तसेच सर्व सभासदांना प्लॅटफॉर्म उपस्थित व्हावा या उद्देशाने शेल्टर चे आयोजन करण्यात येते. प्रगतशील नाशिकमध्ये १, २ व ३ बीएचके सोबत स्टुडिओ अपार्टमेंट ते ८ बीएचके सदनिका निवासी व औद्योगिक प्लॉट, व्यावसायिक जागा, सीनियर सिटीजन हाऊसिंग असे अनेक पर्याय शेल्टर मध्ये उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.

९ शिखरांमध्ये वसलेले नाशिक ९ विविध क्षेत्रात प्रगती करत असून दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा हा नाशिकच्या विकासाची कवाडे उघडून अनेक संधी घेऊन येईल असे उद्गार हे त्यांनी काढले. आगामी नूतन वर्षात स्वच्छ गोदेसाठी सर्वांनी संकल्प करावा असे आवाहन देखील त्यांनी केले.

त्यानंतर आपल्या मनोगतात बोलताना प्रदर्शनाचे समन्वयक गौरव ठक्कर यांनी प्रदर्शनाची विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले की दर दोन वर्षांनी होणारे शेल्टर हे प्रदर्शन मागील प्रदर्शनापेक्षा अधिक उत्कृष्ठ करण्याचा आमचा मानस असतो.

 

 

 

यावर्षी शेल्टरची वैशिष्ट्ये म्हणजे १०० हून अधिक विकसकांचे ५०० हून अधिक पर्याय येथे उपलब्ध असून दररोज दर ३ तासांनी लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे आणि बम्पर बक्षीस –टी.व्ही.एस दुचाकी जिंकण्याची संधी आहे. सहभागी विकसकांकडून विविध आकर्षक योजना जसे नोंदणी शुल्क माफ, नो जीएसटी घोषित केले असून आंतरराष्ट्रीय स्तराचा प्रदर्शनाचा लेआउट आहे.

क्यु आर कोड स्कॅन करून पूर्व नोंदणी केल्यास प्रवेश मोफत असून सोबतच १८ वर्षाखालील मुलांना प्रवेश मोफत आहे. लहान मुलांसाठी फ्रावशी शाळेतर्फे विशेष प्ले एरिया असून भविष्यातील नाशिक या विषयावर तज्ञांनी रेखाटलेले प्रदर्शन व सुसज्ज फूड कोर्ट येथे आहे. प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांना मोफत पार्किंगची सुविधा व व्हॅले पार्किंग उपलब्ध आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक –

क्रेडाई चा शेल्टर हा उपक्रम भव्य असून नाशिक मधील विकासाचे प्रतिबिंब आहे. सुंदर असलेले नाशिक सुरक्षित देखील असावे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, शहरात विविध ठिकाणी सी. सी. टी. व्ही. लावण्यासाठी क्रेडाई ने नेहमीच सहकार्य केले असून भविष्यात देखील त्यांचे सहकार्य असेल असा विश्वासहि त्यांनी व्यक्त केला.

आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड –

आधुनिकता व परंपरा यांचा सुंदर संगम असलेल्या नाशिकमध्ये गेल्या साडे चार वर्षांपासून कार्यरत आहे. नाशिककरांकडून प्रेम व जिव्हाळा मिळाला असल्याने मी मनाने नाशिककरच झाले आहे. आदिवासी बांधवांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावे यासाठी शबरी नॅचरलस् हा ब्रॅण्ड बाजारात आणला आहे. आदिवासी भागातील अजून एक उत्पादन बांबूचा बांधकामात वापर करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

 

 

एनएमआरडीएच्या (नाशिक प्राधिकरण) आयुक्त मनीषा खत्री –

सुंदर असलेल्या नाशिकच्या भविष्यासाठी शेल्टर हा एक महत्वाचा टप्पा ठरेल.

 

नाशिक प्राधिकरणाचा डेव्हलमेंट प्लॅन सध्या तयार होत असून या प्लॅन साठी सर्वांनी अपेक्षा, सल्ला व सूचना द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले.

 

 

शेल्टर २०२४ चे मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जक्शय शहा यांची देखील यावेळी समायोजित भाषणे झाली कार्यक्रमाचे आभार अनंत ठाकरे यांनी मानले.

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजॉय गुप्ता, जयंत भातांब्रेकर, कोषाध्यक्ष हितेश पोतदार, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋशिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज खिंवसरा, अंजन भलोदिया, अतुल शिंदे, श्रेणिक सुराणा, हंसराज देशमुख, नितीन पाटील, शामकुमार साबळे, सागर शहा, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशित अटल, सुशील बागड, सचिन चव्हाण, निरंजन शहा, सतीश मोरे, किरण शहा, प्रकाश चौधरी, तुषार संकलेचा, युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर, युथ विंगचे सह समन्वयक सुशांत गांगुर्डे, वृषाली महाजन, सोनाली बागड हे विशेष सहकार्य करत आहेत

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नाशिक क्रेडीई शेल्टर  प्रदर्शन.

शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन ! गृह स्वप्नपूर्ती चा योग नाशिक- २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील पी.टी.सी. समोरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित शेल्टर -२०२४ या गृह प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून उद्या दिनांक २० रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात १५ लाखापासून ५ कोटी पर्यंत घरे , दुकाने , प्लॉट , फार्म हाऊस , ऑफिस , गोडाऊन , शेत जमीन , औद्योगिक प्लॉट यांचे असंख्य पर्याय तसेच इंटेरियर , बांधकाम साहित्य , नाविन्य पूर्ण तंत्रज्ञान , सुरक्षा साहित्य , गृह कर्ज असे अनेक स्टॉल एकाच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली. उद्घाटन प्रसंगी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा , नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर , नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली ! नाशिक(प्रतिनिधी)::- लाखोचे गृहस्वप्न पूर्ण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संघटना क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे येत्या २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर -२०२४ हे गृहप्रदर्शन आयोजित होत असून प्रदर्शन स्थळी डोम उभारणी चा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.. या प्रदर्शनात अगदी १० लाखापासून ५ कोटी पर्यंत घरे, दुकाने, प्लॉट, फार्म हाऊस, ऑफिस, गोडाऊन, शेत जमीन, औद्योगिक प्लॉट यांचे असंख्य पर्याय तसेच इंटेरियर, बांधकाम साहित्य, नाविन्य पूर्ण तंत्रज्ञान, सुरक्षा साहित्य, गृह कर्ज असे अनेक स्टॉल एकाच छताखाली उपलब्ध असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली. बांधकाम व्यावसायिकाचे कोणत्याही शहराच्या जडणघडणी मध्ये महत्वाची काम असते. नाशिककर आणि मोठ्या प्रमाणात या गृहप्रदूषणा स भेट द्यावी असे आयोजका तर्फे सांगण्यात आले आहे.

 

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे